VIDEO : राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना घेऊन जेव्हा ट्रॅक्टर चालवतात!

VIDEO : राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना घेऊन जेव्हा ट्रॅक्टर चालवतात!

'आपण अनेक गाड्या चालविल्या मात्र ट्रॅक्टर चालविण्याची संधी कधी मिळाली नव्हती.'

  • Share this:

लुधीयाना 15 मे : लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या झंझावती दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये पक्षाच्या नेत्यांना घेऊन बुधवारी चक्क ट्रॅक्टर चालवला. प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकातही राहुल गांधी हे सतत असे प्रयोग करत लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं या निवडणुकीत दिसून आलं.

पंजाबमधल्या लुधियानात आज राहुल यांची जाहीर सभा होती. एका शेतातच त्यांच्या सभेचं मैदान असल्याने सभा संपल्यानंतर राहुल गांधी यांनी शेताचाही दौऱ्या केला. त्याच दरम्यान शेतातल्या ट्रॅक्टरवर ते बसले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि इतर नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी स्वत:ट्रॅक्टर चालवत काही अंतरापर्यंत गेले.

आपण अनेक गाड्या चालविल्या मात्र ट्रॅक्टर चालविण्याची संधी कधी मिळाली नाही असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान 19 मे रोजी असून त्यात पंजाबमधल्या काही जागांचा समावेश आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी आहे.

बंगालमध्ये प्रचारबंदी

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त करत मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (14 मे) कोलकातामध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं कठोरातील कठोर पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी (16 मे) रात्रीपासूनच प्रचारबंदी लागू केली आहे.

या कारवाईनुसार रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही पक्षाला येथे प्रचार करता येणार नाही. लोकसभा निवडणूक 2019च्या अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया 19 मे रोजी पार पडणार आहे. पण पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहता आयोगानं 17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू केली आहे.

First published: May 15, 2019, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading