चंदीगड, 28 जून : पंजाब विधानसभेत पंजाबचे तुरुंग मंत्री हरजोत बैंस
(Harjot Singh Bains) यांनी उत्तरप्रदेशातील गँगस्टर मुख्तार अन्सारीबाबत
(Mukhtar Ansari) मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. तुरुंगमंत्र्यांनी सांगितले की, आधीच्या सरकारने मुख्तार अन्सारी याच्याविरोधात खोटा एफआयआर नोंदवला होता आणि त्यांच्याविरुद्ध चालानही सादर केले नव्हते. ही बाब गंभीर आहे, असे मंत्री म्हणाले. मुख्तार अन्सारीला पंजाबमधील रोपड़ तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याला यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या बदल्यात मागील सरकारने 55 लाख रुपये खर्च केले, असा खुलासा तुरुगमंत्री हरजोत बैंस यांनी केला आहे.
सरकारी पैशांचा दुरुपयोग -
मुख्तार अन्सारीला यूपीला जाण्यासाठी यूपी सरकारने अनेक वेळा प्रोडक्शन वॉरंट जारी केले. पण आधीच्या सरकारने मुख्तार अन्सारीला यूपी पोलिसांच्या ताब्यात दिले नाही. त्यानंतर यूपी सरकारला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. यूपी सरकार सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर पंजाब सरकारने मुख्तार अन्सारीसाठी सुप्रीम कोर्टात एक प्रसिद्ध वकील उभा केला, आता त्यासाठी तब्बल 55 लाख रुपयांचे बिल आले आहे.
पंजाबच्या जनतेचा पैसा अशा कामांवर का खर्च करायचा, असा मोठा प्रश्न आधीच्या सरकारवर उपस्थित होत असल्याचे मंत्री म्हणाल्या. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे बैंस म्हणाले. मुख्तार अन्सारीला रोपड़ तुरुंगात ठेवण्यात आले होते. जिथे 25 कैदी बसू शकतील अशा बॅरेकमध्ये मुख्तार अन्सारीला ठेवण्यात आले होते आणि व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली होती.
हेही वाचा - Assam Floods: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळलं 2 मजली पोलीस स्टेशन! पुराचा थरारक VIDEO आला समोर
25 कैद्यांच्या जागेत फक्त एकच जण -
सर्व काही कोणाच्या सांगण्यावरून घडले, यासाठी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले असल्याचे हरजोत यांनी सांगितले. मुख्तार अन्सारी हे 2 वर्षे 3 महिने रोपर तुरुंगात होता. त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला तुरुंगात ठेवण्यात आले आहे, असे कोणतेही चलन सादर करण्यात आलेले नाही, असे खुलासा मंत्री हरजोत बैंस यांनी विधानसभेत केला. तसेच अन्सारी यांना ज्या ठिकाणी 25 कैद्यांना ठेवायला हवे होते, त्याठिकाणी फक्त एकट्या अन्सारीला ठेवण्यात आले. आता 55 लाखांचे बिल आले आहे, ते आम्ही का द्यायचे? असा सवालही त्यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.