Home /News /national /

कॅप्टन चिडले! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच दिला हाय कमांडना इशारा

कॅप्टन चिडले! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच दिला हाय कमांडना इशारा

थेट सोनिया यांनाच इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या हाय कमांडला त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी खरमरीत चिठ्ठी लिहून इशारा देण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला असावा.

  चंदिगड, 16 जुलै: राज्याच्या राजकारणात तुम्ही पडू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील या अर्थाची चिठ्ठी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी हाय कमांडला लिहिल्याने खळबळ उडाली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींनी आता उघड स्वरूप धारण केलं आहे. काँग्रेसने नवी जबाबदारी दिलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या काम करण्याची पद्धत सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना रुचणारी नाही. त्यातूनच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्पष्ट शब्दांत चिठ्ठी लिहिल्याचं समजतं.

  काँग्रेसच्या हाय कमांडला त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी खरमरीत चिठ्ठी लिहून इशारा देण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला असावा. त्यामुळे हाय कमांडची पकड ढिली झाली की काय अशी चर्चा राजधानीत सुरू आहे.

  काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता नाराज झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते हरीश रावल उद्याच (शनिवार, 17 जुलै) चंदिगडला रवाना होणार आहेत. सोनिया गांधी यांच्या वतीने ते त्यांची बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील, अशी शक्यता आहे.

  गडकरीजी, तुम्ही सर्वात यशस्वी मंत्री आहात, पण... ! माजी मंत्र्याचं पत्र

  सिद्धू यांचं वर्चस्व कायम राहिलं तर पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडेल, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बजावलं आहे. दुसरीकडे कॅप्टनविरोधी गटातले काही मंत्री सिद्धू यांच्या गोटात सामील होत बैठका घेत आहेत. सिद्धू यांच्या गोटात 5 मंत्री आणि 10 आमदार असल्याचं समजतं.

  सिद्धू यांच्या समर्थकांची बैठक सुरू होताच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीदेखील मोहालीतील फार्म हाउसमध्ये आपल्या समर्थकांची बैठक घेतली

  First published:

  Tags: Punjab

  पुढील बातम्या