#News18RisingIndia Summit : राहुल गांधींनी राजकारणात जागा तयार केली -कॅप्टन अमरिंदर सिंह

#News18RisingIndia Summit : राहुल गांधींनी राजकारणात जागा तयार केली -कॅप्टन अमरिंदर सिंह

" दिल्लीकर आता नवा पर्याय शोधत आहे. लोकं अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला वैतागली आहे"

  • Share this:

20 मार्च : काळानुसार माणसं बदलत असतात. राहुल गांधी सुद्धा आता बदलले आहे. त्यांनी राजकारणात आपली जागा तयार केली आहे असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलंय. ते न्यूज 18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटमध्ये बोलत होते.

नवी दिल्लीत हाॅटेल ताज पॅलेसमध्ये न्यूज 18 नेटवर्कचा रायझिंग इंडिया समिट मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अऱविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. केजरीवाल आता माफीनामा सादर करत आहे. पण सध्या आपमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. केजरीवाल सध्या अस्वस्थ आहे. त्यांच्याविरोधात अनेक मानहानीचे खटले दाखल झाले आहे. त्यामुळे ते असं वागत असतील असा टोला सिंह यांनी लगावला. तसंच दिल्लीकर आता नवा पर्याय शोधत आहे. लोकं अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला वैतागली आहे अशी टीकाही त्यांनी केली.

"राहुल गांधींनी राजकारणात जागा बनवली"

राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना सिंह यांनी तोंडभरून कौतुक केलं."जेव्हा राजीव गांधी भाषण देत होते. तेव्हा ते मला त्यांच्या भाषणातील चुका काढण्यासाठी सांगत होते. दोन वर्षांनंतर त्यांनी यूएनमध्ये शानदार भाषण केलं होता. लोकं काळानुसार बदलत असतात. आता राहुल गांधी सुद्धा बदललेले आहे. त्यांनी राजकारणात आपली जागा बनवली आहे. आम्ही त्यांना सिंगापूर, सिलिकाॅन व्हॅलीमध्ये बोलताना पाहिलं. देशभरात प्रचार सभांमध्ये पाहिलं त्यांच्यातला बदल आमच्यासाठी मार्गदर्शक आहे" असं सिंह म्हणाले.

'...तर लोकं भाजपला जागा दाखवतील'

मी 55 वर्षांपासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत काँग्रेसमध्ये अनेक चढउतार पाहिले. भारत हा आशा अपेक्षांनी भरलेला तरुणांचा देश आहे. आम्हीही आशावादी आहोत. आज काँग्रेस सत्तेत नाही. उद्याचा दिवस काहीही असू शकतो. कालपर्यंत पंजाबमध्ये आमच्या फक्त 14 जागा होत्या. आता आमचे सरकार आहे. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. आज जनता भाजपकडून अपेक्षा ठेवत आहे. जर त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीतर जनता त्यांना त्यांची जागा दाखवले असा इशाराही सिंह यांनी भाजपला दिला.

"दिल्लीच्या प्रदूषणाला शेतकरी जबाबदार नाहीच"

दिल्लीत प्रदूषणाला शेतकऱ्यांना जबाबदार ठरवलं जातंय. यावर सिंह यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. शेतकरी आपल्या शेतातला कचरा पेटवण्यापासून रोखू शकत नाही. शेतकऱ्यांचं सध्याचं उत्पन्न पाहिलं तर ते कमी आहे. अशात त्यांना प्रदूषणासाठी जबाबदार धरणे चुकीचे ठरेल असा परखड मत सिंह यांनी व्यक्त केलं.

तसंच शेतकऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे याला माझा ठाम विरोध आहे. पंजाबमुळे दिल्लीत प्रदूषण होते पण याची सुरुवात पाकिस्तानपासून सुरू झाली आहे असा दावाही सिंह यांनी केला.

First published: March 20, 2018, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading