मराठी बातम्या /बातम्या /देश /

'माझ्याविरुद्ध निवडणूक लढवा' काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांचं सिद्धू यांना आव्हान

'माझ्याविरुद्ध निवडणूक लढवा' काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांचं सिद्धू यांना आव्हान

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे गेल्या काही दिवसांपासून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांच्यावर टीका करत आहे. सिद्धू यांच्या या टीकेला आता अमरिंदर सिंग यांनी उत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

चंदीगड, 28 एप्रिल: पंजाब काँग्रेसमधील मतभेद (Punjab Congress) हे चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे गेल्या काही दिवसांपासून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांच्यावर टीका करत आहे. सिद्धू यांच्या या टीकेला आता अमरिंदर सिंग यांनी उत्तर दिलं आहे. अमृतसरचे आमदार असलेल्या सिद्धूंनी माझ्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवावी. त्यांचं डिपॉझिट जप्त होईल, असं आव्हान अमरिंदर सिंग यांनी दिलं आहे.

अमरिंदर सिंग या विषयावर बोलताना म्हणाले की," ते (सिद्धू) रोज काही तरी बोलत आहेत. त्यांनी वक्तव्य केलं नाही, असा एक दिवस जात नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडं काहीही अजेंडा नाही. ते कोणत्या पक्षात आहेत हेच त्यांना माहिती नाही. ते काँग्रेसमध्ये असतील तर शिस्तभंग करत आहेत. त्यांना या प्रकारचे वक्तव्य करण्याची गरज काय? ते बहुधा आम आदमी पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा त्यांना परत घेणार नाही. अकाली दलबाबतही तीच परिस्थिती आहे. ते कुठं जातील? एकतर आमच्या पक्षात राहतील किंवा बाहेर पडतील." अशी टीका अमरिंदर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केली आहे.

सिद्धू आणि त्यांच्या पत्नी नवजोत कौर (Navjot Kaur) हे अमरिंदर सिंह यांच्या पटियाळा मतदारसंघात प्रचाराला येणार का? असा प्रश्न अमरिंदर यांना विचारण्यात आला. त्यानंतर अमरिंदर यांनी सिद्धू यांना आव्हान दिलं " सिद्धू यांचं पटियाळामध्ये स्वागत आहे. त्यांना पटियाळामध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवता येणार नाही. मागच्यावेळी जनरल जेजे सिंग निवडणुकीला उभे होते. त्यांचं  डिपॉझिट जप्त झालं. सिद्धूंचीही अवस्था तीच होईल," असा दावा अमरिंदर यांनी केला.

गोव्यात लॉकडाऊनला उशीर? आरोग्य मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर 48 तासाने निर्णय

चार वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष कसं करता येईल? असा प्रश्नही अमरिंदर यांनी विचारला. सिद्धू यांच्यापेक्षा अनेक सर्व कॅबिनेट मंत्री वरिष्ठ आहेत, असं सांगत त्यांनी सिद्धूंची उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी देखील फेटाळली. अर्थात सिद्धूंना कोणतं पद द्यायचं याचा निर्णय हायकमांडला करायचा आहे. माझं मत पक्षानं विचारलं तर मी हेच सांगणार असं अमरिंदर यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Congress, Punjab