10 वर्षांच्या मुलाचा त्रास पाहून 'या' मुख्यमंत्र्यांनी केला फोन, पुढे काय झालं पाहा VIDEO

10 वर्षांच्या मुलाचा त्रास पाहून 'या' मुख्यमंत्र्यांनी केला फोन, पुढे काय झालं पाहा VIDEO

एक 10 वर्षांचा मुलगा आर्थिक गरज भागवण्याचा मोजे विकत असल्याचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला होता.

  • Share this:

चंदीगड, 8 मे : देशात सध्या कोरोनाचं (Covid-19) संकट वाढलं आहे. या काळात अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंजाबमधील (Punjab) लुधियानाचा एक 10 वर्षांचा मुलगा आर्थिक गरज भागवण्याचा मोजे विकत असल्याचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला होता. ज्या वयात शाळा शिकायची, मोठं काही तरी होण्याची स्वप्न पाहयची त्या वयात त्या मुलावर मोजे विकण्यासाठी रस्त्यावर फिरण्याची वेळ आली होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती.

या दहा वर्षांच्या मुलाचे नाव वंश आहे. तो सध्याच्या कोरोना संकटात शाळा सोडून किंवा घरी न थांबता रस्त्यावर  मोजे विकत असल्याचं  पाहून  एका कार चालकानं त्याला 50 रुपये देऊ केले होते, पण पण स्वाभिमानी वंशनं ती मदत नाकारली. त्याच्या कष्टाचा हा व्हिडीओ पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांच्यापर्यंत व्हिडीओ पोहचला. या व्हिडीओची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी तात्काळ वंशशी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला आणि मदतीचं आश्वासन दिलं.

अमरिंदर सिंग यांनी वंशच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असून त्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ वंशला शाळेत दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आहेत.

Covid रुग्णाला जगविण्यासाठी थ्री इडियट्सप्रमाणे टू व्हिलरवर रुग्णालयात घेऊन गेले अश्विन-रेखा

वंशचे वडील परमजीत हे देखील रस्त्यावर मोजे विकतात तर आई राणी गृहिणी आहेत.  त्याला तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार असून हे सर्व जण एका भाड्याच्या घरात राहतात.

Published by: News18 Desk
First published: May 8, 2021, 5:01 PM IST

ताज्या बातम्या