मंगळवारी न्यूज 18 पंजाबच्या सुनहरा पंजाब कार्यक्रमात मुख्यमंत्री मान यांनी सांगितलं की, त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. ती एक चांगली आई आहे. मुलांची नीट सांभाळते, त्यांची काळजी घेते. घटस्फोटानंतर त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती तिच्या नावे केल्याचंही त्यांनी सांगितलं. हे वाचा - Dalai Lama Birthday : शेतकऱ्याचा मुलगा ते नोबेल पुरस्कार, तिबेटसाठी केला जगभर संघर्ष पण आता त्यांनी पुन्हा संसार थाटावा अशी त्यांच्या आईची इच्छा होती. आईच्या इच्छेसाठी ते पुन्हा लग्नासाठी तयार झाले. जिच्याशी भगवंत मान यांचं लग्न होणार आहे तिचं नाव डॉक्टर गुरप्रीत कौर आहे. मान यांची आई आणि बहिणीने त्यांच्यासाठी गुरप्रीतला पसंत केलं आहे. गुरप्रीत आणि भगवंत मान आधीपासूनच एकमेकांना ओळखता. गुरप्रीतचं मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी येणंजाणंही होतं.Punjab CM Bhagwant Mann will get married in a close private ceremony at his house in Chandigarh tomorrow with Dr Gurpreet Kaur. CM Delhi & AAP National convener Arvind Kejriwal will be in attendance. CM Mann was divorced from his earlier marriage almost 6 years back.
(file pic) pic.twitter.com/tC3Zd2LGfv — ANI (@ANI) July 6, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.