अमरिंदरसिंग यांनी लाल दिवाच नाहीतर सुरक्षाही केली कमी, आता फडणवीसही करतील का?

अमरिंदर सिंग यांनी स्वत:ची सुरक्षा कमी केलीये. एवढंच नाहीतर त्यांनी आपल्या इतर मंत्र्यांचीही सुरक्षा कमी केलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2017 04:10 PM IST

अमरिंदरसिंग यांनी लाल दिवाच नाहीतर सुरक्षाही केली कमी, आता फडणवीसही करतील का?

22 एप्रिल : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आदर्श घालून दिलाय. अमरिंदर सिंग यांनी स्वत:ची सुरक्षा कमी केलीये. एवढंच नाहीतर त्यांनी आपल्या इतर मंत्र्यांचीही सुरक्षा कमी केलीय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा निर्णय घेतील का असा प्रश्न विचारला जातोय.

लाल दिव्यांची संस्कृती पहिल्यांदा बंद केली ते पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पण बिचारे ते काँग्रेसचे मुख्यमंत्री. त्यांना हवं तेवढं क्रेडिट मिळालं नाही. त्यांच्यानंतर यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी लाल दिवे बंद केले त्याची मात्र वाहवा झाली. आता पंजाबच्याच मुख्यमंत्र्यांनी व्हीआयपींना मिळणाऱ्या सेक्युरिटी कमी केलीय. विशेष म्हणजे त्यात त्यांची स्वत:चीही सुरक्षा कमी करून टाकलीय. त्यामुळे जवळपास 2 हजार पोलीस आता खरोखर लोकांच्या सेवेला मिळतील.

आता प्रश्न असा आहे की जे अमरिंदरसिंग यांनी केलं ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का? कारण अमरिंदरसिंग यांनी त्यांच्या कॉनव्हॉयमधले सुरक्षा जवान, ते जिथं जातील तिथं लागणारी पोलीस सुरक्षाही कमी केलीय.

जेवढी गरज आहे तेवढी सुरक्षा ठेवण्याचे आदेश अमरिंदरसिंग यांनी दिलेत. मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीसही असा निर्णय घेतील का?

 मुंबईतल्या सिक्युरिटीची काय स्थिती ?

Loading...

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा व्हीआयपी सिक्युरिटीत

कपात करण्याचा निर्णय

एकट्या मुंबईत 48 हजार पोलीस कर्मचारी पैकी

27 हजार हे सेक्युरिटीत

सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी मुंबईत फक्त

20 हजार पोलीस

मुंबईत 1 लाख लोकांमागे फक्त 137 पोलीस

असं प्रमाण

पंजाब मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत आता जागोजागीचे

पोलीस असणार नाहीत, महाराष्ट्रातही होईल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...