पुन्हा समोर आलं नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाकिस्तान प्रेम’

पुन्हा समोर आलं नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाकिस्तान प्रेम’

पाकिस्तानचा दौरा हा दक्षिण भारत दौऱ्यापेक्षा जास्त चांगला होता

  • Share this:

हिमाचल प्रदेश, १३ ऑक्टोबर २०१८- पंजाबचे केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे भरभरून कौतुक केले आहे. यावेळी सिद्धू यांचं पाकिस्तान प्रेम हिमाचल प्रदेश येथील कसोली येथे चाललेल्या साहित्य उत्सवात पाहायला मिळाले. एका चर्चा सत्रात सिद्धू यांनी पाकिस्तानचा दौरा हा दक्षिण भारत दौऱ्यापेक्षा जास्त चांगला होता असे म्हटले.

सिद्धू म्हणाले की, 'तुम्ही पाकिस्तानात कधी जा... तिकडे भाषा, खाणं काहीचं बदलत नाही. एवढंच काय तर तिकडचे लोकंही बदलत नाही. पण दक्षिण भारतात गेल्यावर तिथल्या भाषांपासून ते लोकांपर्यंत सारं काही बदलतं. तुम्हाला दक्षिण भारतात राहण्यासाठी इंग्रजी किंवा त्यांची भाषा शिकावी लागते. पण पाकिस्तानात मात्र असे काहीच नाही.' सिद्धू यांच्या या पाकिस्तान प्रेमामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकणार यात काही शंका नाही.

याआधीही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सिद्धू पाकिस्तानात गेले होते. तिथे गेल्यावर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. यावेळीही सिद्धू यांनी पाकिस्तान आणि बाजवा यांच्या कौतुकांचे पूल बांधले होते.

इस्लामाबादमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धू म्हणाले होते की, ‘मी भारतातून प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे. जेवढं प्रेम मी भारतातून घेऊन आलो आहे, त्याहून १०० टक्के जास्त प्रेम मी पाकिस्तानातून घेऊन जात आहे.’

पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांच्या गळाभेटीबद्दल स्पष्टीकरण देताना सिद्धू म्हणाले होते की, ‘जनरल बाजवा यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले की, आम्हाला शांतता हवी आहे. यानंतर ते म्हणाले की, आम्ही गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर करतारपुर प्रवास सुरू करण्याच्या विचारात आहोत.’

त्यांच्या या पाकिस्तान भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धू आणि पर्यायाने काँग्रेस यांना धारेवर धरले होते.

VIDEO : ....आणि हा 'बच्चू' पोहायला लागला; कासवावरही फिजिओथेरपीची जादू

First published: October 13, 2018, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading