पंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात ?

पंजाबमधल्या बॉम्ब हल्ल्यामागे ISI चा हात ?

बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

अमृतसर, ता. 18 नोव्हेंबर : अमृतसरजवळ निरंकारी भवनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. आयएसआय समर्थीत खालिस्तानी अतिरेकी संघटनांनी हा स्फोट घडवला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या या मताला महत्व प्राप्त झालंय.


अमृतसर जवळच्या अदनाला गावातल्या निरंगारी भवनमध्ये सत्संग सुरू असताना हा हल्ला झाला. यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार दोन तरूण दुचाकीवर आलेत आणि त्यांनी कार्यक्रमात गर्दीची जागा पाहिली आणि ग्रेनेड फेकून निघून गेले. दोन दिवासांआधीच पंजाब पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. यावेळी 200 भाविक सत्संगात उपस्थित होते.


पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएची एक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास करत आहे.


काय होता पोलिसांचा इशारा?


जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे 6 ते 7 दहशतवादी पंजाबमध्ये घुसले आहेत, अशी माहिती पंजाब पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. खबरदारी म्हणून पंजाब पोलिसांनी दोन हाय अलर्टही जारी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2018 10:47 PM IST

ताज्या बातम्या