विद्यापीठातला धक्कादायक प्रकार; मुलींची कपडे उतरवून घेतली झडती

टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन कुणी फेकला असं विचारत विद्यापीठातल्या महिला वॉर्डनने मुलींचे कपडे उतरवून त्यांची झडती घेतली.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 10:34 AM IST

विद्यापीठातला धक्कादायक प्रकार; मुलींची कपडे उतरवून घेतली झडती

चंदीगड, 1 मे : टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन कुणी फेकला असं विचारत विद्यापीठातल्या महिला वॉर्डनने मुलींचे कपडे उतरवून त्यांची झडती घेतली. हा धक्कादायक प्रकार घडला पंजाबच्या अकाल युनिव्हर्सिटीममध्ये.

सोमवारी भटिंडा इथल्या या विद्यापीठातल्या लेडीज टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन फेकलेला दिसल्यावर महिला वॉर्डन भडकल्या. त्यांनी इतर दोन महिला सुरक्षा रक्षकांसह मुलींना जाब विचारायचा प्रयत्न केला. कुठल्याही मुलीने आपण तो टाकल्याची कबुली दिली नाही, म्हणून चक्क त्यांनी मुलींचे कपडे जबरदस्तीने उतरवून त्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. सुमारे 12 विद्यार्थिनींची अशी झडती घेण्यात आली. त्याविरोधात विद्यार्थिनींनी तक्रार केली.

या प्रकाराची वाच्यता बाहेर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संतापून आंदोलन छेडलं. मंगळवारी दिवसभर विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दबाव वाढल्यानंतर दोन महिला वॉर्डन आणि दोन सुरक्षा कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने विलंबाने कारवाई केल्याचा आरोप केला आहे. विद्यापीठ कँपसमध्ये मुला-मुलींनी एकमेकांशी बोलू नये अशासारखे जाचक नियम आहेत. त्याविरोधातही विद्यार्थी तक्रार करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...