मराठी बातम्या /बातम्या /देश /

Punjab Election 2022: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांना झटका, भाऊ जसविंदर धालीवालच्या हाती भाजपचा झेंडा

Punjab Election 2022: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांना झटका, भाऊ जसविंदर धालीवालच्या हाती भाजपचा झेंडा

गेल्या दोन-चार दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

गेल्या दोन-चार दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

गेल्या दोन-चार दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

चंडीगढ, 12 जानेवारी : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम (five state assembly election 2022) जाहीर होताच राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. उत्तरप्रदेशातील योगी सरकारमधील मंत्री, आमदारांनी भाजपला रामराम केल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर आता पंजाबमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांचा चुलत भाऊ जसविंदर सिंह धालीवाल यांनी भाजपत प्रवेश केला आहे.

चंडीगढमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत जसविंदर सिंह धालीवाल यांनी भाजपत प्रवेश केला आहे. पंजाबमध्ये राजकीय नेत्यांचे पक्षांतर सुरूच आहे. शिरोमणी अकाली दलच्या अनेक नेत्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला होता.

वाचा : निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका, योगी सरकारमधील बड्या मंत्र्याचा राजीनामा

मंगळवारीच आमदार अरविंद खन्ना, शिरोमणी अकाली दलाचे नेते गुरुदीप सिंह गोशा आणि धर्मवीर सारिन यांनी भाजपत प्रवेश केला होता.केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत या सर्वांचा भाजप प्रवेश झाला होता. यापूर्वी शिरोमणी अकाली दलाचे नेते गुरुतेज सिंह गुंधियाना, कमल बख्शी, मधुमीत, जगदीप सिंग धालीवाल, राजदेव खालसी आणि माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांनीही भाजत प्रवेश केला आहे.

पंजाब विधानसभेचा कार्यकाळ मार्च महिन्यात समाप्त होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, पंजाबमध्ये एका टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. 14 फेब्रुवारी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने 77 जागा जिंकत आपलं सरकार स्थापन केलं होतं. या निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवण्यात येश आले होते तर शिरोमणी अकाली दलला 15 जागांवर विजय मिळवण्यात यश आले होते.

वाचा : भाजप अलर्ट मोडवर; अमित शहांच्या उपस्थितीत 10 तास खलबतं, विरोधकांना देणार झटका

5 राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

केंद्रीय निवडणूक आयोगाने गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

पहिल्या टप्पा - 10 फेब्रुवारीला मतदान

दुसरा टप्पा -14 फेब्रुवारी

तिसरा टप्पा -20 फेब्रुवारी

चौथा टप्पा -23 फेब्रुवारी

पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी

सहावा टप्पा - 3 मार्च

सातवा टप्पा -7 मार्च

पाचही राज्यांची 10 मार्चला मतमोजणी

First published:

Tags: BJP, Election, Punjab, काँग्रेस