Home /News /national /

निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून भाजप नेत्यांना दिली शिक्षा; झाडाला बांधून पक्षाचा झेंडाही जाळला

निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून भाजप नेत्यांना दिली शिक्षा; झाडाला बांधून पक्षाचा झेंडाही जाळला

कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात पक्षाचा झेंडाही जाळला.

    राजस्थान, 10 नोव्हेंबर : निवडणुकीचं तिकीट (Election Ticket) मिळालं नाही म्हणून भाजप पार्टीच्या (BJP) पदाधिकाऱ्यांना झाडाला बांधलं जाऊ शकतं याचा कधी कुणी विचारली केला नसेल. मात्र राजस्थानमधील नागौरमध्ये काही अशीच घटना समोर आली आहे. येथे रागावलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्याला झाडाला बांधलं. कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात पक्षाचा झेंडाही जाळला. त्यानंतर दुसऱ्या नेत्यांनी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची सुटका केली. येथे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जारी करण्यात आली होती. या यादीमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते. कार्यकर्त्यांनी या यादीवर आक्षेप घेतला व त्याचा विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तीन पदाधिकाऱ्यांना झाडाला बांधलं. याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. पदाधिकाऱ्यांनी झाडाला बांधलं आहे आणि कार्यकर्ता हाय हायचे नारे लावत आहेत. अनेक लोक मोबाइलमधून व्हिडीओ शूट करीत होते. लोकांनी भाजप हाय हायचे नारे देत भाजपच्या झेंड्याला आग लावली. यानंतर स्थानिक गावकरी आणि स्थानिक मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्यातील वाद सोडवला. यावेळी राजस्थानमध्ये पंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी असंतोष आहे हे ही वाचा-शत्रुघ्न सिन्हांनी भाजप सोडल्यानंतर कुटुंबातल्या सगळ्यांना पत्करावी लागली हार हा व्हिडीओ हरौर मंडळाचा असल्याचे सांगितले जात आहे. येथे पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट पडले आहेत. आपल्या गटाला सपोर्ट करायला आणि पक्षपात करण्याचा आरोप पदाधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. लोकांनी असेही सांगितले की, माजी कॅबिनेट मंत्री अजय सिंह किलक यांनी आपल्या उमेदवाराला तिकीट मिळवून दिलं आहे. आणि यादी जारी झाल्यानंतर ते जयपूर निघून गेले. यानंतर कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला व त्यांनी पदाधिकाऱ्यांना रश्शीने झाडाला बांधलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Rajasthan

    पुढील बातम्या