बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला शिक्षा फक्त ‘थप्पड’, पंचायतीचा धक्कादायक निर्णय

या प्रकरणात आरोपी भगत याचा काँग्रेसच्या आमदारांशी जवळचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे

या प्रकरणात आरोपी भगत याचा काँग्रेसच्या आमदारांशी जवळचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे

  • Share this:
    रायपूर, 15 मार्च : छत्तीसगड येथील जशपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला दोन थोबाडीत लगावण्याची शिक्षा देण्यात आली आहे. जशपूर येथील पंचायतीने हा निर्णय दिला आहे. या पंचायतीच्या निर्णयाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हा खुलासा झाला आहे. याशिवाय पंचायतीने पीडितेला याबाबत पोलिसांत तक्रार करू नये असं सांगितलं होतं. हे वाचा - कोरोनाचा IPLला दणका! एका झटक्यात मुंबई इंडियन्सला बसणार हजारो कोटींचा फटका 20 वर्षीय तरुणी कॉलेज सुटल्यानंतर घरी परतत होती. यावेळी आरोपी नितेश भगत तिच्याजवळ आला आणि घरी सोडण्यासाठी लिफ्ट देतो असं म्हणाला. नितेश हा पीडित तरुणीच्या नातेवाईकांमधील एक आहे. त्यामुळे ती त्याच्या बाईकच्या मागे बसली. मात्र काही वेळाने नितेश तिला त्रास देऊ लागला. नितेश निर्जनस्थळी तिला घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याला तरुणी विरोध करीत होती आणि तिथून तिने पळ काढला. ती धावत घरी आली आणि घडलेला सर्व प्रकार तिने कुटुंबीय़ांना सांगितला. याबाबत पोलिसांत तक्रार करण्याऐवजी पंचायतने शुक्रवारी यावर निर्णय देण्याचं ठरवलं. भगतचे काँग्रेसच्या आमदारांशी जवळचे संबंध आहेत, असंही सांगितलं जात आहे. पंचायतीच्या सदस्यांनी भगत व पीडितेच्या कुटुंबीयांना बोलवले आणि भगतला दोन थोबाडीत लगावण्याची शिक्षा दिली. यावेळी भगतच्या बहिणीने त्याच्या कानशिलात लगावली आणि पीडितेची माफी मागण्यासाठी तिच्या पाया पड़ण्याची जबरदस्ती केली. काही गावकऱ्यांनी या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ शूट केला आणि समाज माध्यमांवर पोस्ट केला. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर आल्यानंतर अनेक माध्यम प्रतिनिधी गावात हजर झाले. यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात हे वृत्त आलं आहे. पोलिसात तक्रार केल्यानंतर तरुणीने सांगितले की,' मी त्याने विचारलेल्या लिफ्टचा स्वीकार केला होता. कारण भगत माझ्य़ा ओळखीचा होता. तो मला सुखरुप घरी पोहोचवले असं वाटलं, म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला.' तिने केलेल्या तक्रारीत भगतने पंचायतीच्या सदस्यांना लाच दिल्याचाही आरोप केला आहे. या प्रकरणात आरोपीवर आयपीसी (IPC) सेक्शन 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पंचायतीच्या सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्याबाबत पोलिसांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे सांगितले. हे वाचा - 11 रुपयांत बचावाची गॅरेंटी देत होता कोरोना बाबा, पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी
    First published: