Home /News /national /

पुजेसाठी आणलेली फळं खाल्ली म्हणून शिक्षा; भररस्त्यात लहानग्यांना रस्सीने बांधून मारहाण

पुजेसाठी आणलेली फळं खाल्ली म्हणून शिक्षा; भररस्त्यात लहानग्यांना रस्सीने बांधून मारहाण

या दोन लहानग्यांना मारत असताना अनेकजण बघत होते. मात्र कोणीच त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलं नाही

    मथुरा, 26 जुलै : लहान मुलं ही देवाघरची फुलं असं आपण म्हणतो. कारण त्यांच्यातील निरागसपणा कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. मात्र कृष्ण नगरी मथुरामध्ये यालाच काळीमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. मथुरातील कस्बा मांट भागातील एका गावात धार्मिक अनुष्ठान आयोजित करण्यात आलं होतं, यासाठी लागणाऱ्या फळांमधील काही फळ या दोन लहान मुलांनी खाल्ली म्हणून त्या दोघांना भररस्त्यात रश्शीला बांधून जोरदार मारहाण केली. दुर्देव म्हणजे या लहान मुलांना मारहाण करीत असताना बघ्यांपैकी कोणीच त्यांना वाचवण्यासाठी पुढे आले नाही. ती मुलं ओरडत होती..मोठमोठ्याने रडत होती..मात्र कोणीच त्यांच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यानंतर दोघांपैकी एकाच्या वडिलांनी 112 वर कॉल केला त्यानंतर ती मुलं वाचली. पोलिसांनीही संपूर्ण प्रकाराचा तपास करीत गुन्हा दाखल केला आहे. हे वाचा-कसलं भारी! पक्ष्याचं पिल्लू जिवंत राहावं म्हणून 35 दिवस गावात होता अंधार या गावात एका शाळेजवळ धार्मिक अनुष्ठान सुरू होतं, यावेळी प्रसादासाठी लागणारी फळं शाळेत ठेवली होती. गावातील दोन लहानग्यांनी यामधील काही फळं खाल्ली. कार्यक्रमानंतर गावातील काही जणांनी या मुलांना बोलावलं व रश्शी बांधून मारहाण केली. यावेळी अनेकजण बघत होते मात्र कोणीच त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. यामधील एका मुलाच्या वडिलांनी पोलिसांना कॉल केल्यानंतर त्या दोघांना सोडण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून याचा तपास सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या