साधूच्या वेशातील ढोंग्यांना भर चौकात फाशीची शिक्षा द्या - रामदेव बाबा

साधूच्या वेशातील ढोंग्यांना भर चौकात फाशीची शिक्षा द्या - रामदेव बाबा

राजस्थानमधील एका तरुणीने दिल्लीतील दाती महाराज या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुविरोधात बलात्काराची तक्रार केलीये.

  • Share this:

राजस्थान, 19 जून : आपल्या देशात साधूसंतांची एक परंपरा असून त्या परंपरेला कोणीही धक्का लावू नये. पण साधूच्या वेशातील काही लोक साधूसंतांना कलंकित करत आहेत. अशा लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मत योगगुरु रामदेव बाबा यांनी मांडलं आहे.

राजस्थानमधील एका तरुणीने दिल्लीतील दाती महाराज या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुविरोधात बलात्काराची तक्रार केलीये. या प्रकरणी दाती महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या पोलीस दाती महाराजांचा शोध घेत असून आसाराम बापू, बाबा राम रहीमनंतर आणखी एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रामदेवबाबा यांनी कोटा येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, काही लोकं चांगल्या कामात अडथळा ठरत आहे. साधूच्या वेशातील काही लोक साधूसंतांच्या परंपरेला कलंक लावत आहेत. अशा ढोंगी भामट्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

First published: June 19, 2018, 8:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading