Home /News /national /

मुसेवाला हत्या प्रकरण: आणखी एकाच्या आवळल्या मुसक्या, राज्याबाहेर जाऊन संतोष जाधववर पुणे पोलिसांची कारवाई

मुसेवाला हत्या प्रकरण: आणखी एकाच्या आवळल्या मुसक्या, राज्याबाहेर जाऊन संतोष जाधववर पुणे पोलिसांची कारवाई

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील शूटर संतोष जाधव (Police Arrested Santosh Jadhav) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. जाधव हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही वॉन्टेड संशयित होता.

पुणे 13 जून : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Moosewala) हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आलं होतं. अया प्रकरणात सौरभ महाकाळनंतर आता पुणे पोलिसांना दुसरा आरोपी संतोष जाधव (Police arrested Santosh Jadhav) याला अटक करण्यात यश आलं आहे. त्याला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. या प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचं समोर आलं आहं. त्यापैकी पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावंही समोर आली होती. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील शूटर संतोष जाधव याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. जाधव हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही वॉन्टेड संशयित होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी मूसेवाला खून प्रकरणातील संशयित जाधव याच्या साथीदारालाही अटक केली आहे. संतोष जाधवला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. 20 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.. पोलिसांनी जाधवच्या टोळीतील आणखी एकाला अटक केली आहे. Punjabi Singer Moose Wala Murder: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन, ISI नं रचला होता हत्येचा कट? दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार झाले होते. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती. गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गॅंगने महाराष्ट्र राज्यातून दोन शार्प शूटर बोलावले होते. संतोष जाधव आणि महाकाल नावाचे हे दोन शूटर होते. ज्यांनी मुसेवालावर गोळीबार केला, यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केली. मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. Moosewala Murder case : मुसेवाला हत्या प्रकरणाला नवे वळण, पुण्यात अटक झालेल्या सौरभ 'महाकाल'बाबत नवी माहिती समोर नेमकं काय घडलं होतं? पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Crime, Murder, Punjab, Singer

पुढील बातम्या