माओवादी समर्थकांच्या अटकेविरूद्धची सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे पोलिसांच लक्ष

माओवादी समर्थकांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावरचा निर्णय कोर्टानं राखीव ठेवलाय.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2018 03:43 PM IST

माओवादी समर्थकांच्या अटकेविरूद्धची सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे पोलिसांच लक्ष

नवी दिल्ली,  ता. 20  सप्टेंबर : भीमा कोरेगाव प्रकरणी ज्या पाच माओवादी समर्थकांना पुणे पोलिसांनी अटक केली होती त्या अटकेला आव्हान देणाऱ्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावरचा निर्णय कोर्टानं राखीव ठेवला असून पुढच्या आढवड्यात हा निर्णय अपेक्षीत आहे. तोपर्यंत त्या सर्वांना नजरकैदेतच राहावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर पुणे पोलिसांच्या कारवाईचं भवितव्य अवलंबून आहे. पुणे पोलिसांच्या अटकेच्या कारवाईविरोधात काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टानं त्या सर्वांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.

भीमा कोरोगाव प्रकरणानंतर उफाळलेल्या हिंसाचाराला चिथावणी आणि मदत केल्याच्या आरोपांवरून पुणे पोलिसांनी देशातल्या विविध शहरांमध्ये छापे घालून विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसालविस आणि सुधा भारद्वाज या पाच जणांना अटक केली होती.

या सर्वांकडून आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. या सर्वांचा माओवाद्यांशी थेट संपर्क असून त्यांना अर्थ आणि शस्त्रपुरवढा करण्यात याच लोकांचा पुढाकार आहे असा दावा करत पोलिसांनी त्यांचा माओवाद्यांशी झालेला पत्रव्यवहारही जाहीर केला होता.

काय आहे त्या पत्रांमध्ये?

रोना विल्सन यांनी सेंट्र्ल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं पत्र

Loading...

शहरी भागातल्या लोकांना जंगलात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जास्तित जास्त असंतोष निर्माण झाला पाहिजे. मोदी राज संपवण्यासाठी युद्ध पुकारलं पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या खेरदीसाठी 8 कोटी रूपयांची जमवाजम झाली आहे. शस्त्र खरेदीचे पूर्ण अधिकार वरवर राव यांना दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर हँड ग्रेनेड आणि चार लाख गोळ्यांची खेरदी होणार असून नेपाळ आणि मणिपूरमधल्या पुरवठादारांशी संपर्क साधण्यात आलाय. राजीव गांधींची हत्या ज्या प्रकारे झाली तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली पाहिजे.

सुधा भारव्दाज यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं पत्र

काश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांशी संपर्कात आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. शहरात संशोदन करणारे फेलो, बुद्धिवादी नेते यांना आपली विचारसरणी पटवून देऊन त्यांना गडचिरोली आणि इतर ठिकाणी आणलं पाहिजे.

गौतम नवलखा यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड सुदर्शन यांना लिहिलेलं पत्र

लोकांवर अत्याचार होत आहेत. त्या विरूद्ध पेटून उठलं पाहिजे. एल्गार परिषदेसारखे कार्यक्रम घेऊन त्यातून जास्तित जास्त असंतोष कसा भडकेल याची काळजी घेऊ. एखाद्या दलित तरूणाचा मृत्यू झाल्यास त्याचं खूप भांडवलं केलं पाहिजे. म्हणजे असंतोष वाढेल.

रोना विल्सन यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं आणखी एक पत्र

2013 पासून मोठी कारवाई झालेली नाही. कुठली शस्त्रास्त्र खरेदी करायची आहेत याचे फोटोही विल्सन यांनी प्रकाश यांना पाठवले होते. यात रशिया आणि चीनमधल्या मशिनगन्सचे फोटो असून ते विल्सन यांच्या लॅपटॉपमधून पोलिसांनी डी कोड करून हस्तगत केले आहेत.

वरवर राव यांनी नागपूरचे वकिल सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेलं पत्र

नोटबंदीमुळे जंगलातल्या लोकांना पैशाची अडचण भासत आहे. तुमच्याकडे पैसे पाठवले होते मात्र त्याच वितरण अजून झालं नाही अशी माहिती आहे. नेमकं काय झालं तेही कळत नाही. पैसे नसल्यानं कारवाया थंडावल्या आहेत.

वरवर राव यांच्या या पत्राला सुरेंद्र गडलिंग यांनी दिलेलं पत्र

नोटबंदीमुळं तपासणी जोरात सुरू होती. त्यामुळं गडचिरोलीत पैसे पाठवायला उशीर झाला. दुसरं काहीही कारण नाही. तुम्ही दिलेले पैसै आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. आणि त्या पैशांचा पुरवढा सुरू केला आहे. आणि काही रक्कम पोहोचलीही आहे.

सेंट्रल कमेटीचे सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांनी महाराष्ट्र विभागाच्या कमेटीला लिहिलेलं पत्र

जेएनयु आणि इतर भागातून मुलं जंगलात पाठवली पाहिजे. सरकारविरूद्ध युद्ध पुकारलं पाहिजे. बऱ्याच दिवसांमध्ये मोठी कारवाई झाली नाही. जास्तित जास्त असंतोष भडकला पाहिजे. म्हणजे सरकारविरूद्ध असंतोष निर्माण होईल.

VIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...