सूरत, 12 जुलै : पुण्यातला कुख्यात गुंड गजानन मारणेची (Gajanan marne) जेलमधून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी गजा मारणेला पुन्हा जेलची हवा खावी लागली पण याचे लोण आता महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये (Gujarat ) पसरले आहे. सूरतमध्ये (Surat) कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांचं फटाके फोडून स्वागत करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आला आहे.
संपूर्ण गुजरातमध्ये दारूबंदी आहे. पण, अवैधरित्या दारूची राजरोसपणे विक्री होत असते. सूरतमध्ये एक दारू तस्कर शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांच्या साथीदारांनी जोरदार फटाके फोडून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील महिन्याभरातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे सूरत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे.
सूरतमधील लिंबायत हा भाग गुन्हेगारांचा अड्डा मानला जातो. या भागात राहणाऱ्या कैलाश पटेल नावाच्या गुन्हेगार हत्याच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला होता. रविवारी जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर त्यांच्या पंटर लोकांनी जेलमधून सुटका झाल्या आनंदात जंगी स्वागत केलं.
फक्त 2 पदार्थामुळे फटाफट चरबी होईल कमी; पोटाचा घेरातही दिसून येईल परिणाम
दरम्यान, मध्यंतरी दारू तस्करीच्या आरोपाखाली एका गुंडाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर या तस्कराची हत्या झाली. या प्रकरणावरून लिंबायत क्षेत्रात वाद निर्माण झाला होता. सूरत शहर आणि ग्रामीण भागातील दारू तस्कारांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. यामुळे या भागात तणावाचे वातावरण होते.
विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या प्रकल्पाला केंद्राकडून ब्रेक!
त्यानंतर कारागृहातून दारू तस्कर बाहेर आले तेव्हा त्यांच्या साथीदारांनी फटाके फोडून स्वागत केलं. एवढंच नाहीतर गावात रॅली काढत वाजत गाजत दारू तस्कराचं स्वागत केलं. सूरतमध्ये अशा घटना वारंवार घडत आहे. एकाच महिन्यात चार घटना घडल्या आहे. त्यामुळे दारू तस्कर आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.