पुण्यातील बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण; 19 वर्षाच्या मुलास अटक!

पुण्यातील बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण; 19 वर्षाच्या मुलास अटक!

पुण्यातील मालधक्का चौकातून अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करूननंतर तिचा खून केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका 19 वर्षाच्या मुलास अटक केली आहे.

  • Share this:

पुणे, 28 ऑगस्ट: पुण्यातील मालधक्का चौकातून अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करूननंतर तिचा खून केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका 19 वर्षाच्या मुलास अटक केली आहे. मंगळवारी सकाळी पीडीत मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे वृत्त आल्याने एकच खळबळ उडाली होती. पण पीडित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचा प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. पण आरोपीने या चिमुकीच्या शरीरावर अत्यंत विकृत पद्धतीने अनेक ठिकाणी चावा घेतल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अपहरण, खून आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

काय झालं होतं

मालधक्का चौकातून मंगळवारी पहाटे फुटपाथवर झोपणाऱ्या एका 3 वर्षाच्या मुलीला उचलून नेण्यात आले. त्यानंतर मुलीचे डोक आपटून खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यार्डात थांबलेल्या रेल्वेच्या डब्यात डोक आपटून तिची हत्या करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडीत मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती.

SPECIAL REPORT : राजकारणातही अवतरली 'शिंदेशाही', गाठणार का विधानसभा?

First published: August 28, 2019, 8:26 PM IST
Tags: pune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading