रिक्षाचे पेपर नाही म्हणून पोलिसांनी फाडली 35 हजारांची पावती, धक्क्याने चालकाचा मृत्यू!

रिक्षाचे पेपर नाही म्हणून पोलिसांनी फाडली 35 हजारांची पावती, धक्क्याने चालकाचा मृत्यू!

रक्कम ऐकल्यानंतर रिक्षा चालकाला धक्का बसून हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात 23 दिवसानंतर रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

जौनपूर (उत्तर प्रदेश), 26 सप्टेंबर : एका रिक्षा चालकाने वाहतूकीचे नियम मोडल्यानंतर त्यांना 35 हजार रुपयांची पावती फाडण्यात आली. याच्या धक्क्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. रिक्षा चालवताना 35 हजाराची पावती आरटीओकडून फाडण्यात आली. ही रक्कम ऐकल्यानंतर रिक्षा चालकाला धक्का बसून हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात 23 दिवसानंतर रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे.

31 ऑगस्ट रोजी आरटीओ विभागात पीटीओ म्हणून तैनात असलेल्या स्मिता वर्मा दोरान यांनी हे ऑटोचे चलान कापले. ज्यामध्ये वाहनांचा कागद न दाखविल्याबद्दल एकूण 18 हजार 500 रुपये कापले गेले. चालान कापल्यानंतर 23 दिवसानंतर रिक्षा चालक गणेश अग्रहरी यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या एआरटीओ प्रशासनाने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण एवढी पावती आकारल्याच्या धक्क्यात गणेश यांचा मृत्यू झाला असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. गणेश हे उत्तर प्रदेशमधील नगर कोतवाली स्टेशनच्या कलीचाबाद इथले राहणारे आहेत. सदर कुटुंबाने सरकारला गणेशच्या मृत्यूला जबाबदार मानले आहे.

इतर बातम्या - नवी मुंबईत पुरुषावर 5 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार!

मोटार वाहन कायद्याच्या नवीन नियमांनुसार, संपूर्ण देशात कडक कारवाई करण्यात येत आहे. जौनपूरमध्येही वाहतूक विभाग प्रचंड कारवाई करत आहे. वाहतूक पोलिसांनीही ऑटो चालकासाठी 35,000 चे चलान कापले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असा आरोप केला जात आहे. पावतीवरील रक्कम पाहून गणेश घाबरुन गेले होते. त्यामुळे त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रकृती बिघडली होती. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

इतर बातम्या - EDची नोटीशीमुळे पवारांना मिळणार 'पोलिटिकल गेन', ग्रामीण महाराष्ट्रातून पाठिंबा!

या प्रकरणात चालान कापणार्‍या आरटीओच्या महिला पीटीओ अधिकारी स्मिता वर्मा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तर याविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मृत गणेशच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 01:14 PM IST

ताज्या बातम्या