धक्कादायक! पुलवामा हल्लेखोरांनी Amazonवरून मागवलं स्फोटकांचं साहित्य, NIA च्या तपासात खुलासा

धक्कादायक! पुलवामा हल्लेखोरांनी Amazonवरून मागवलं स्फोटकांचं साहित्य, NIA च्या तपासात खुलासा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं आणखी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मार्च : गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं आणखी दोन लोकांना ताब्यात घेतलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुलवामात हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली आयईडी स्फोटकं तयार करण्यासाठी कच्चा माल इ कॉमर्स साइटवरून घेतल्याची धक्कदायक माहिती उघड झाली आहे. राष्ट्रीय तपास पथकाने ताब्यात घेतलेल्या संशियितांनी ही माहिती दिली.

पुलवामा हल्ल्याप्रकरणी एनआयएने आणखी दोघांना ताब्यात घेतलं आहे. अॅमेझॉनने शेअर केलेल्या माहितीनंतर एनआयएने ही कारवाई केली आहे. अॅमेझॉनवरून स्फोटक रसायने आणि इतर साहित्य खरेदी केली गेल्याची माहिती अॅमेझॉनने एनआयएला दिली होती.  एनआयएने आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यातील एकाने अॅमेझॉनवरून स्फोटकं बनवण्यासाठी रसायनं विकत घेतल्याची माहिती दिली. एनआयएने शुक्रवारी श्रीनगरमधून वजीर उल इस्लाम आणि हकरीपुरा इथून मोहम्मद अब्बास राठेर या दोघांना ताब्यात घेतलं. याआधी बाप लेकीसह हल्लेखोराच्या एका सहकाऱ्याला एनआयएने पकडलं आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितलं की,'प्राथमिक चौकशीमध्ये इस्लामने ऑनलाइन रसायने खरेदी केल्याचा खुलासा केला. जैशच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सांगितल्यानुसार आयईडी तयार करण्यासाठी रसायनं, बॅटरी आणि इतर साहित्या अॅमेझॉनवरून घेतलं आणि दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवल्याचं वजीर उल इस्लामने सांगितलं.

भोळ्या चेहऱ्यामागे दहशतवादी!

काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने गेल्या आठवड्यात बाप लेकीला ताब्यात घेतलं होतं. त्यापूर्वी 28 फेब्रुवारीला या प्रकरणी पहिल्यांदा एका संशयिताला अटक केली होती. एनआयएने दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदच्या शाकिर बशीर मागरेला काश्मीरमधून ताब्यात घेतलं होतं. शाकिरने आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डारला मदत केली होती. शाकिर पुलवामाच राहणार असून त्याचं फर्नीचरचं दुकान आहे.

आदिल अहमद डारने स्फोटकं असलेली कार सुरक्षा दलाच्या ताफ्यातील गाडीवर धडकवली होती. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. शाकिरने याबाबत सांगितलं की, त्याने आदिल अहमद डार आणि इतर एक सहकारी मोहम्मद उमर फारुकला 2018 च्या शेवटपासून फेब्रुवारीत झालेल्या हल्ल्यापर्यंत घरात ठेवलं होतं.

हे वाचा : सौंदर्याआड क्रूरता! TikTok VIDEO करून झाली स्टार आता हत्येच्या आरोपाखाली अटक

IED तयार करण्यासही मदत केली

शाकिर बशीरने आयईडी तयार करण्यासही मदत केली होती. अटकेनंतर शाकिरला 15 दिवस एनआयएनं त्याला ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, हल्ल्याशी संबंधित त्याची चौकशी एनआयए करणार होती.

पुलवामात 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. दुपारी 3.30 च्या सुमारास आदिल अहमद डार एका कारमधून आला आणि त्यानं कार सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवली. त्यानंतर झालेल्या धडकेनंतर स्फोट झाला. यात जवांना घेऊन जाणारी बस उडाली आणि 40 जवान शहीद झाले होते.

हे वाचा : क्लास सुरू असलेल्या इमारतीला भीषण आग; सामान्यांतल्या हीरोंमुळे अलगद वाचले विद्यार्थी! पाहा VIDEO

First published: March 7, 2020, 7:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading