Pulwama Terror Attack- तीन महिन्यांच्या मुलीचा चेहराही पाहू शकले नाहीत शहीद रोहिताश लांबा

सीआरपीएफच्या प्रमुखांनी फोनवरून रोहिताश यांना वीरमरण आल्याचं सांगितलं. त्या एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2019 12:26 PM IST

Pulwama Terror Attack- तीन महिन्यांच्या मुलीचा चेहराही पाहू शकले नाहीत शहीद रोहिताश लांबा

रोहिताश यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, मुलीला पाहण्यासाठी रोहिताश होळीला घरी येणार होते. मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर आघात केला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच फक्त लांबा कुटुंबीयच नाही तर त्यांच्या पूर्ण गावावर शोककळा पसरली.

रोहिताश यांचा मित्र म्हणाला की, घरात सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. पण तेव्हाच श्रीनगरवरून आलेल्या एका फोनने लांबा कुटुंबियांचं आयुष्यच बदलून गेलं. सीआरपीएफच्या प्रमुखांनी फोनवरून रोहिताश यांना वीरमरण आल्याचं सांगितलं. त्या एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

रोहिताश यांचे भाऊ जितेंद्र (जीतू) लांबा यांची तब्येत बिघडली. गावातील इतरांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा सारेच शोकाकूळ झाले. पूर्ण गाव रात्रभर जागलं. पूर्ण गावात लोक वेगवेगळ्या ठिकाणी बसून रोहिताशच्या शौर्याच्या गोष्टी एकमेकांना सांगत होते.

Loading...

जम्मू- काश्मीर येथील पुलवामामध्ये गुरुवारी दुपारी भारतीय जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले.

२५०० जवांनाचा ताफा पुलवामा जिल्ह्यातील श्रीनगर- जम्मू राजमार्गावरून जात होता. यावेळी सुमारे १०० किलो स्फोटकांनी भरलेली गाडी बस जवळ येताच त्याचा स्फोट करण्यात आला. यात ४४ जवानांचा जागीच मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 12:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...