‘ज़िंदा रहने के मौसम बहुत हैं मगर, जान देने की रुत रोज़ आती नहीं...’ महाराष्ट्रातील शहीद सुपुत्राची कहाणी

‘ज़िंदा रहने के मौसम बहुत हैं मगर, जान देने की रुत रोज़ आती नहीं...’ महाराष्ट्रातील शहीद सुपुत्राची कहाणी

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत.

  • Share this:

बुलडाणा, 15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लात 44 जवान शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातीलही दोन जवानांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत या जवानाला दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला.

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. संजय राजपूत यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्यांच्या गावी मोठा आक्रोश करण्यात आला. संजय राजपूत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन चिमुकल्यांचं छत्र हरपलं आहे.

शहीद संजय राजपूत यांच्या मित्रांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. 'शाळेत असल्यापासून भारतीय लष्कराचं आकर्षण होतं. ते एनसीसीमध्येही सहभाग घेत असत. त्यातून मग त्यांनी भारतीय सेनेत जाण्याचं ठरवलं,' असं त्यांचे मित्र सांगतात.

'1996 मध्ये सेवेत रूजू झालेल्या संजय राजपूत यांचा कार्यकाळ 20 वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये संपला. पण इतकी वर्ष तिथं काम करून त्यांची देशसेवेची भावना आणखीनच वाढली होती आणि त्यातून मग त्यांनी आपला कार्यकाळ 5 वर्षांनी वाढवून घेतला,' असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

पण हा कार्यकाळ संपण्याला 2 वर्ष उरली असतानाच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात संजय राजपूत यांनी आपले प्राण गमावले. देशासाठी लढणाऱ्या या वीर सुपुत्राचा आम्हाला अभिमान आहे, अशी भावना आता त्यांच्या मूळ गावी व्यक्त करण्यात येत आहे.

पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला :

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

'सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य',पुलवामा हल्ल्यावर PM मोदी UNCUT

First Published: Feb 15, 2019 01:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading