News18 Lokmat

Pulwama Attack : 'जमात-ए-इस्लामी'ची 52 कोटींची संपत्ती जप्त, आणखी 15 जणांना अटक

'जमात-ए-इस्लामी'वर दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत पाच वर्षांपर्यंत बंदी

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 02:52 PM IST

Pulwama Attack : 'जमात-ए-इस्लामी'ची 52 कोटींची संपत्ती जप्त, आणखी 15 जणांना अटक

नवी दिल्ली, 03 मार्च : दहशतवादाचं कंबर मोडण्यासाठी केंद्र सरकारकडून वारंवार कठोर पाऊलं उचलली जात आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर तर दहशतवादविरोधातील मोहीम अधिक तीव्र स्वरुपात करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी कनेक्शन असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटना 'जमात-ए-इस्लामी'वर पाच वर्षांपर्यंत बंदी घातली.

रविवारी सकाळी(3 मार्च)या संघटनेच्या आणखी 15 जणांना अटक करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 52 कोटी रुपयांची संपत्तीही जप्त करुन कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्चपासून ते आतापर्यंत 'जमात-ए-इस्लामी' संघटनेशी संबंधित असलेल्या 370 हून अधिक जणांविरोधात अटकेची कारवाई केली गेली आहे.

15 जणांविरोधात अटकेची कारवाई

जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार(3 मार्च) जमात-ए-इस्लामी (जम्मू काश्मीर)संघटनेशी संबंधित असलेला सैयदपुराचा माजी जिल्हा अध्यक्ष बशीर अहमद लोनसहीत त्याचे अन्य साथीदार अब्दुल हामिद फयाज, जाहिद अली, मुदस्सिर अहमद, गुलाम कादिर, मुदासिर कादिर, फयाज वानी, जहूर हकाक, अफजल मीर, शौकत शाहिद, शेख जाहिद, इमरान अली, मुश्ताक अहमद आणि अजक्स रसूलला अटक करण्यात आले. या संघटनेची 52 कोटी रुपयांची संपत्ती तपास यंत्रणांनी जप्त केली आहे.

या संघटनेशी संबंधित असणाऱ्यांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे, त्या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे.

Loading...

'जमात-ए-इस्लामी'वर बंदी, कारण...

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील जमात-ए-इस्लामी संघटनेवर बंदी घातली. जमात-ए-इस्लामीचा दहशतवादी संघटनांशी संबंध असून, देशात अनेक ठिकाणी विघातक कारवाया घडवण्यात, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवण्यात ही संघटना जबाबदार असल्याचा आरोप आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी या संघटनेच्या म्होरक्यांना आणि हस्तकांना अटक केली. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे 'जमात-ए-इस्लामी'?

'जमात ए इस्लामी'ची स्थापना 1941मध्ये करण्यात आली. यानंतर 'जमात ए इस्लामी' वेगवेगळ्या संघटनांमध्ये विभागली गेली. ज्यामध्ये जमात-ए-इस्लामी पाकिस्तान आणि जमात-ए-इस्लामी हिंदचा समावेश होता. दरम्यान, जमात-ए-इस्लामीपासून प्रभावित होऊन कित्येक संघटना स्थापन करण्यात आल्या. यामध्ये जमात-ए-इस्लामी बांग्लादेश, काश्मीर, ब्रिटन आणि अफगाणिस्तान इत्यादी संघटनांचा समावेश आहे.

जैशच्या संपर्कात पाकिस्तान; कुरेशींच्या 'त्या' उत्तरानं पाकिस्तानचा बनाव उघड

'जमात-ए-इस्लामी'वर यापूर्वी 1975 मध्ये दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 1990 मध्येही केंद्र सरकारनं बंदी घातली होती. 1971 मध्ये या संघटनेनं सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता.

काश्मीर खोऱ्यात 'हिजबुल मुजाहिद्दीन'ला उभं करण्यात 'जमात-ए-इस्लामी'नं मदत केली. तसंच, ही संघटना 'हिजबुल मुजाहिद्दीन' संघटनेचा उजवा हात आहे, असंही म्हटलं जातं.

भूलथापांना बळी पडू नका! Twitterवर अभिनंदन वर्तमान यांचं बनावट अकाउंट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...