पुलवामानंतर 'जैश' आणखी एका हल्ल्याच्या तयारीत, खळबळजनक माहिती उघड

पुलवामानंतर 'जैश' आणखी एका हल्ल्याच्या तयारीत, खळबळजनक माहिती उघड

लष्कराच्या धडक कारवाईने दहशतवादी संघटना हादरुन गेल्या आहेत. त्यामुळे त्या घातपात करू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व देश हादरून गेला होता. या हल्ल्याला आठवडाही होत नाही तोच सुरक्षा दलाच्या हातात अतिरेक्यांचं धक्कादायक संभाषण हाती लागलंय. जैस ए मोहम्मद ही संघटना आणखी एका हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने जैश च्या अतिरेक्यांचं संभाषण रेकॉर्ड केलं त्यात हे अतिरेकी नवी योजना तयार करण्याची योजना बनवत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाल्याने सुरक्षा दलाची चिंता वाढली आहे. लष्कराने केलेल्या धडक कारवाईत जैश चा स्वयंघोषीत कमांडर आणि पुलवामाचा मास्टरमाईंड कामरान उर्फ गाजी याचा सुरक्षा दलाने ठार केलं होतं.

पुलवामा हल्ल्यानंतर मंगळवारी सुरक्षा दलाने पत्रकार परिषद घेतली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने ISI आण च्या मदतीने हा हल्ला केला आहे, अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.

'जो बंदूक हाती घेईल त्याला मारलं जाईल. आत्मसमर्पण करा आणि शांतता प्रस्थापित करा. दहशतवाद्यांच्या आई-वडिलांनी त्यांना समर्पण करण्यास सांगावं,' असं आवाहन सैन्याने केलं आहे.

गुजरातमध्ये अलर्ट

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. यात प्रमुख रेल्वे स्थानक, गुजरातची किनारपट्टी, स्टेच्यू ऑफ युनिटी, धार्मिक स्थळ आणि चित्रपटगृहांचा समावेश आहे. राज्य पोलिस दलाने या सर्व ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दहशतवादी गुजरातमध्ये असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाने गुजरातसह देशातील अन्य मुख्य शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. काश्मीरनंतर दहशतवादी दिल्ली आणि उत्तर प्रदेशकडे येण्याची शक्यता आहे. दहशतवादी उत्तर प्रदेशमधून शस्त्र विकत घेऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधून शस्त्रसाठा घेऊन काश्मीरला जाणाऱ्या काही जणांना दिल्लीत अटक करण्यात आली होती.

SPECIAL REPORT : 'शरण या, अन्यथा मरणाला तयार राहा'

First published: February 20, 2019, 8:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading