S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

जम्मू - श्रीनगर हायवेबाबत लष्कराचा महत्त्वपूर्ण निर्णय

जम्मू - श्रीनगर हायवेच्या सुरक्षेकरता आता लष्करानं महत्त्वपूर्ण असं पाऊल उचललं आहे.

Updated On: Apr 2, 2019 08:43 AM IST

जम्मू - श्रीनगर हायवेबाबत लष्कराचा महत्त्वपूर्ण निर्णय

श्रीनगर, 02 मार्च : 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामासारख्या हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दहशतवाद्याला सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आता लष्करानं जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असं पाऊल उचललं आहे. याकरता आता जम्मू - श्रीनगर हायवेचा अभ्यास करण्याकरता एका स्टडी ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, 270 किमी लांब असलेल्या जम्मू - श्रीनगर हायवेची हा स्टडी ग्रुप पाहणी करेल. त्यानंतर सुरक्षेकरता काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत स्टडी ग्रुप काही पर्याय सुचवेल. पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, 'जम्मू- श्रीनगर हायवेची सुरक्षा हे सर्वात मोठं आव्हान आहे'. 30 मार्च रोजी देखील जवानांचा ताफा जात असताना कारचा स्फोट झाला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. अवघ्या 36 तासात हल्लेखोराला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यानं अनेक धक्कादायक असे खुलासे केले.


'CRPF'चा ताफा स्फोटकांनी उडवायचा होता, दहशतवाद्याचा कबुली देणारा VIDEO



पुलवामासारख्याच हल्ल्याची आखली होती योजना

बनिहाल शहरापासून काही अंतरावर एका कारमध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी ओवैस अमीन राथेर याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. शोपियान जिल्ह्यातील वैल गावात राहणाऱ्या ओवैसला एका तपास पथकाने ताब्यात घेतले. तो एका वाहनातून पळून जाण्याच्या तयारीत होता.

30 मार्च रोजी जम्मूकडे जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहनांचा ताफा गेल्यानंतर काही वेळातच एका कारमध्ये स्फोट झाला होता. यात सीआरपीएफच्या एका वाहनाचं नुकसानही झालं. त्यानंतर कारचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

ओवेसला बनिहाल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 8 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्ही फूटेजची मदत घेण्यात आली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर झालेल्या जखमांमुळे संशयातून त्याला ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या पत्रावरून चालकाचे नाव समजले होते. तो हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य ओवैस अमीन असल्याचे समोर आले होते. त्यात पुलवामात झालेल्या हल्ल्यासारखाच आणखी एक हल्ला करण्याचा उल्लेख होता.


VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close