मराठी बातम्या /बातम्या /देश /

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचं असं आहे चीन कनेक्शन

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचं असं आहे चीन कनेक्शन

मौलाना मसूद अझहर हा जेइएम संघटनेचा प्रमुख असून 2002मध्ये संघटनेवर पाकमध्ये बंदी घातली तरीही अझहर मोकाट आहे. 
कंदाहार विमान अपहरणाच्या प्रकरणानंतर जैश-ए-मोहम्मद ही संघटना सर्वाधिक चर्चेत आली होती.

मौलाना मसूद अझहर हा जेइएम संघटनेचा प्रमुख असून 2002मध्ये संघटनेवर पाकमध्ये बंदी घातली तरीही अझहर मोकाट आहे. कंदाहार विमान अपहरणाच्या प्रकरणानंतर जैश-ए-मोहम्मद ही संघटना सर्वाधिक चर्चेत आली होती.

सुमारे १०० किलो स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर आदळून हा हल्ला करण्यात आला. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

मुंबई, 15 फेब्रुवारी : जम्मू- काश्मीर येथील पुलवमा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. दोन दशकातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. सुमारे १०० किलो स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर आदळून हा हल्ला करण्यात आला. देशभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं म्हटलं जात असताना या हल्ल्याचं चीन कनेक्शनदेखील आहे.

भारतानंच केली अजहरची सुटका

अजहर मसूद जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या. 24 डिसेंबर 1999 मध्ये कंदहार विमान अपहरणाची घटना घडली. त्यानंतर 178 प्रवाशांच्या बदल्यात 3 दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये अजहर मसूदचादेखील समावेश होता. आता तोच अजहर भारताला थेट आव्हान देत आहे. सुटका झाल्यानंतर अजहरनं पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली.

पुलवामा हल्ला आणि चीन कनेक्शन

2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला आणि त्यानंतर हल्ल्यामागील मास्टरमाईंड मसूद अजहर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर देशातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये अजहरचा हात असल्याचं समोर आलं. भारतानं याचा जाहीर निषेध पाकिस्तानकडे नोंदवत अजहरला अटक करण्याची मागणी केली. पण, पाकिस्तान सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर भारतानं युनायटेड नेशनमध्ये अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणी केली. पण, या प्रकरणामध्ये आडकाठी करत आहे ते चीन. यापूर्वी युनायटेड नेशनमध्ये झालेल्या प्रत्येक मतदानावेळी चीननं भारताविरोधात मतदान केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादाला चीनचा देखील पाठिंबा असल्याचं स्पष्ट होत आहे.

जगापुढे दहशतवादाचं आव्हान

सध्या भारतापुढेच नाही तर जगापुढे दहशतवादाचं आव्हान आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि फ्रान्ससारखे देशही सध्या दहशतवादाचा सामना करत आहेत.

VIDEO - मुस्लिम बांधवांनी दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

First published:

Tags: Terror attack