पुलवामा हल्ल्याचं पुणे कनेक्शन उघड, एटीएसकडून एकाला अटक

पुलवामा हल्ल्याचं पुणे कनेक्शन उघड, एटीएसकडून एकाला अटक

पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 28 मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. शरियत मंडल असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. बिहार एटीएसनं महाराष्ट्र एटीएससोबत संयुक्त ऑपरेशन राबवून शरियत मंडलच्या मुसक्या आवळल्या. पुण्यातील चाकणमधून मंडलला अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडे सीआरपीएफ जवानांच्या पोस्टिंगबाबतचे तपशील आढळून आले. पुलवामा हल्ल्याशी संबंधित अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शरियतबाबतची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी तातडीनं ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वीच बिहार एटीएसनं केलेल्या कारवाईद्वारे शरियत मंडलबाबतची महत्त्वपूर्ण माहिती समोर आल्याचं म्हटलं जात आहे. 25 मार्च रोजी बिहार एटीएसनं दोन बांगलादेशींना अटक केली होती. या दोघांकडून काही कागदपत्रंदेखील जप्त करण्यात आली होती. दोघंही जमीयत-उल-मुजाहिद्दीन आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेश या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य असल्याची माहिती आहे. खैरुल मंडल आणि अबु सुल्तान अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांकडेही भारतीय सैन्याबद्दलची माहिती असल्याचंही तपासादरम्यान समोर उघड झालं. शिवाय, ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही कागदपत्रंदेखील त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आली.

पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

VIDEO: तुमचं नागपूरचं बंडल तिथंच ठेवा - सुप्रिया सुळे

First published: March 28, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading