Pulwama Terror Attack : आत्मघातकी हल्लेखोराची 'कुंडली'

Pulwama Terror Attack : आत्मघातकी हल्लेखोराची 'कुंडली'

आदिल मोहम्मद दार या दहशतवाद्यानं जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्लेखोराची कुंडली आता समोर आली आहे.

  • Share this:

पुलवामा, 15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण आयईडी हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे 42 जवान शहीद झाले. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. हा हल्ला आदिल मोहम्मद दार या दहशतवाद्याने केला होता. आदिल मोहम्मद दार हा पुलवामातील रहिवाशी होता. बॉम्बस्फोट झालेल्या स्थळापासून केवळ 10 किमी अंतरावर आदिल वास्तव्याला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. पुलवामामधील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरी तरूण दहशतवादाकडे वळत असल्याच्या चर्चां पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

शाळा सोडल्यानंतर जैश - ए - मोहम्मद जॉईन

वर्षभरापूर्वी आदिल अकरावीमध्ये नापास झाला. त्यानंतर त्यानं जैश – ए – मोहम्मद संघटेसोबत काम करणं सुरू केलं. अफगनिस्तानमधील सैन्य मागे घेण्याची घोषणा अमेरिकेनं केली. त्यानंतर हा आपला विजय असल्याची द्वाही तालिबाननं पेटवली. त्याच काळात सुसाईड बॉम्बर बनण्याचा निर्णय आदिलनं घेतला होता.

घटनास्थळापासून आदिल 10 किमी अंतरावर वास्तव्याला होता. जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेमध्ये भरती झाल्यानंतर आदिलला ट्रेनिंग दिली गेली. यावेळी त्याला सुसाईर बॉम्बर कसं बनायचं याबद्दल पूर्णपणे तयार करून घेतलं गेलं. जवळपास वर्षभरानंतर आदिलनं जवानांच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ला केला.

आदिलचा व्हिडिओ आला समोर

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आदिलचा रेकॉर्डेड व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये ‘हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचेपर्यंत मी स्वर्गात पोहोचलेला असेन’ असं म्हणतात आदिल दिसत आहे. शिवाय, या व्हिडिओमध्ये आदिल काश्मिरी लोकांना दहशतवादासाठी प्रोत्साहित करताना देखील दिसत आहे.

मार्च 2016 पासून आदिल बेपत्ता

19 मार्च 2016पासून आदिल तैसिफ आणि वसिम या दोन मित्रांसोबत बेपत्ता होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोठा दहशतवादी हल्ला

पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा मागील 30 वर्षातील सर्वोत मोठा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी 2016मध्ये उरी इथं देखील दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये 19 जवान शहीद झाले होते. दरम्यान, मागील 13 महिन्यांमधील जैश – ए – मोहम्मदनं केलेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

 

First published: February 15, 2019, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading