हा होता पुलवामाच्या हल्लेखोराला ट्रेन करणारा मास्टरमाइंड : आणखी 7 फिदायीन केले होते तयार

हा होता पुलवामाच्या हल्लेखोराला ट्रेन करणारा मास्टरमाइंड : आणखी 7 फिदायीन केले होते तयार

पुलावामा हल्ल्यानंतर दोन तासांनी दिल्लीत एक फोन केला गेला. 'पुलवामामध्ये त्यांच्यावर हल्ला केलाय. सूड घेतला....' असा निरोप या फोनवरून देण्यात आला.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : पुलावामा हल्ल्यानंतर दोन तासांनी दिल्लीत एक फोन केला गेला. 'पुलवामामध्ये त्यांच्यावर हल्ला केलाय. सूड घेतला....' असा निरोप या फोनवरून देण्यात आला. हा फोन केला गेला होता सज्जाद नावाच्या इसमाला. हा दहशतवादी त्या दिवशी दिल्लीत लपून बसला होता.

पुलवामा हल्ल्याचा आणखी एक आरोपी, मास्टरमाइंड आणि हल्लेखोराला तयार करणारा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्लीत अटक करण्यात आली. सज्जाद NIA च्या कस्टडीत असून त्याला 29 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्लीतल्या पतियाळा कोर्टाने दिले आहेत.

7 तरुणांना बनवलं फियायीन हल्लेखोर

सज्जाद खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो दिल्लीत कपडे विकणारा असल्याचा बनाव करून राहत होता. धक्कादायक बाब म्हणजे सज्जाद हा जैशच्या स्लीपर सेलमध्ये कार्यरत होता. त्याने आतापर्यंत 7 जणांना फिदायीन हल्ल्यांसाठी तयार केलं असल्याची माहिती उघड होत आहे. सज्जाद जैश ए मोहम्मदसाठी काम करत होता. या 7 पैकी 2 जणांविषयीची माहिती सज्जादने स्पेशल सेलला दिली आहे. हे सातही जण आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार केले आहेत. सज्जादने प्रशिक्षण दिलेले सगळे जण काश्मिरी तरुण असून त्यांच्याविषयी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.

चौकशीदरम्यान सज्जादने काश्मीर खोऱ्यातल्या 35 दहशतवाद्यांविषयी माहिती दिली आहे. ते जैश ए मोहम्मदसाठी काम करतात. पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल इथे सज्जादच्या घरातच जैशच्या अनेक महत्त्वाच्या बैठकी होत असत. यामध्ये काही स्थानिक तर काही पाकिस्तानी अतिरेकीसुद्धा सामील होत असत. सज्जादच्या परिवारावर दहशतवाद्यांचा विश्वास होता. त्यांना विश्वासात घेऊनच या बैठका होत. म्हणूनच अतिरेकी संघटनेचा स्लीपर सेल तयार करण्याचं काम सज्जादकडे देण्यात आलं होतं.

पुलवामाचं दिल्ली कनेक्शन

पुलवामा हल्ल्याचं दिल्ली कनेक्शन आता समोर आलं आहे. दिल्ली स्पेशल सेलने आरोपी सज्जाद खान याला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सज्जाद खान हा नुकतंच मारला गेलेल्या 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा मुद्दसिर याचाच साथीदार आहे.

अटक करण्यात आलेला सज्जाद खान हा गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत कपडे विकणाऱ्याच्या वेशात वावरत होता. तसंच मुद्दसिर या जैशच्या दहशतवाद्यासोबतच तो दिल्ली आला होता. दिल्लीत जैशचे स्लीपर सेल तयार करण्याच्या उद्देशाने सज्जाद खान आणि मुद्दसिर हे दिल्लीत आल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वीच मुद्देसिर याला कंठस्नान घालण्यात आलं. त्यानंतर आता सज्जादला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सज्जाद खानच्या भावालाही अझहर मसूदचा भाचा उस्मान हैदर याच्यासोबत ठार करण्यात आलं होतं.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

'...तर हेमा मालिनीसुद्धा पंतप्रधान झाल्या असत्या'

First published: March 22, 2019, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading