तालिबानच्या मदतीनं मसूदचा भारतात हल्ले करण्याचा प्लॅन

भारतात कारवाया करण्यासाठी मसूद अजहरनं तालिबानला भारताविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला होता.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 10:05 AM IST

तालिबानच्या मदतीनं मसूदचा भारतात हल्ले करण्याचा प्लॅन

दिल्ली, 9 मार्च : जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर तालिबानच्या साथीनं भारतात घातपाती कारवाया करण्याच्या विचारात होता. याबाबत त्यानं डिसेंबर 2018मध्ये तालिबान आणि हक्कानी नेटवर्क सोबत बोलणी देखील केल्याची माहिती न्यूज18ला मिळाली आहे. भारताच्या गुप्तचर विभागाला याबाबतची माहिती मिळाली होती. दरम्यान, भारताविरोधात तालिबान्यांना उकसवण्याचा प्रयत्न देखील मसूद अजहरनं केला होता. भारतात आत्मघातकी कारवाया कशा करता येतील? याबाबत हक्कानी नेटवर्कचा कमांडर बिलाल जर्दान आणि गुल अब्दुल रहमान यांच्याशी मसूदनं संपर्क साधला होता. पण, सध्या तरी मसूद आयएसआयच्या सुरक्षेत पाकिस्तानात आहे.

जगात सध्या दहशतवाद वाढताना दिसत आहे. दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. शिवाय, भारतानं एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांच्या तळांना देखील उद्धवस्त केलं.


भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच गोळीबार, PSI मोहिते गंभीर जखमी


Loading...

पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ

पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवादाला थारा नाही, अशी भाषा करणारा पाकिस्तानच दहशतवादाला पोसत असल्याचा ढळढळीत पुरावा समोर आला आहे. पाकिस्तनामध्ये दहशतवाद्यांचे जवळपास 22 कॅम्प आहेत. यामधील 9 कॅम्प हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तान पाठिंबा देत आहे हे स्पष्ट होतं.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं घेतली होती. त्यानंतर भारतानं देखील एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दरम्यान, भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्ताननं आम्ही दहशतवादाला पाठिशी घालत नाही. भारताला देखील जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती. पण, भारतानं पाकिस्तानी विमानांचा भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता.


Special Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...