दहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही

आदिलचे वडिल गुलाम म्हणाले की, 'मी CRPF जवानांच्या मृत्यूचा आनंद साजरा करत नाहीये. मी त्यांच्या कुटुंबियांचं दुख समजतो. कारण, इथे आम्ही कित्येक वर्ष हिंसा सहन करत आहोत'

News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2019 08:04 PM IST

दहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : जम्मू्-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दारचे कुटुंबीय त्याच्या घरी त्याच्या वडिलांना म्हणजेच गुलाम डार यांना अभिनंदन करण्यासाठी येत आहेत. आदिल दारने आयईडी स्फोटामध्ये सीआरपीएफच्या बसला उडवलं ज्यात 40 जवानांना वीरमरण आलं.

इंग्रजी वेबसाईट India Today ने दिलेल्या वृत्तानुसार, आदिलचे वडिल गुलाम म्हणाले की, 'मी CRPF जवानांच्या मृत्यूचा आनंद साजरा करत नाहीये. मी त्यांच्या कुटुंबियांचं दुख समजतो. कारण, इथे आम्ही कित्येक वर्ष हिंसा सहन करत आहोत'

गुलाम पुढे म्हणाले की, 'मला आजच्या तरुणांना कोणताच संदेश द्यायचा नाही आहे. पण माझी सरकारला विनंती आहे की, यावर काहीतरी उपाय काढा. आजच्या तरुणांना या वाटेवर जाण्यापासून थांबवा.'  मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम डार यांच्या घरी लोक शोक व्यक्त करण्य़ासाठी आणि त्यांना 'मुबारक' देण्यासाठीही येत आहेत.

गुलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मार्च 2018ला आदिल बेपत्ता झाला होता. त्याला शोधण्याचे कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले. पण नंतर आम्हाला बातमी मिळाली की, आदिल दहशतवादी बनला.

आत्मघाती हल्लेखोराला 6 वेळा चौकशी करुन सोडले; त्यानेच घेतला 40 जवानांचा बळी!

Loading...

जम्मू्-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या दहशतवादी आदिलने CRPFच्या 40 जवानांचा जीव घेतला त्याला एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

आदिल हा पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे. सप्टेंबर 2016 ते मार्च 2018 या काळात त्याला सहा वेळा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. आदिलला सुरक्षा दलाने दगडफेक प्रकरणी ताब्यात घेतले होते. पण सबळ पुराव्या अभावी त्याला सोडून देण्यात आले होते. केवळ 20 वर्षाच्या आदिलने एक वर्षापूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. आदिलने लहानपणीच शिक्षण सोडले होते. त्यानंतर तो मोलमजुरी करत होता. एक वर्षभरापूर्वी तो भाऊ दरासह मित्रांना भेटण्यासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर ते परत आलाच नाही. आदिल बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

पुलवामामधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आदिल 2016पासून लष्कर-ए-तोयब्बासाठी काम करत होता. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम आदिल करत होता. इतक नव्हे तर लष्करचे कमांडर आणि ज्यांना दहशतवादी व्हायचे आहे अशा युवकांमध्ये मध्यस्थीचे काम आदिल करत असे.

मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते

आदिलने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला असून, मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...