पुलवामा, 18 जून : भारतीय लष्करानं पुलवामा हल्ल्यासाठी अदिल दार या दहशतवाद्याला कार पुरवणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. अनंतनागमध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामधील एका दहशतवाद्याचा हा पुलवामा हल्ल्याशी संबंध होता. त्यानं आदिल दारला पुलवामा येथे आत्मघातकी स्फोट करण्यासाठी कार पुरवली होती. पुलावामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जैश ए मोहम्मद हा दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाला होता. पण, त्याला ठार करण्यास भारतीय लष्काराला यश आलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार आदळून आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. NIAनं तपास सुरू केल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला होता. या हल्ल्याकरता आदिल दार या पुलवामातील दहशतवाद्यांना जवानांच्या ताफ्यावरआत्मघातकी हल्ला केला होता.
भारतानं केला एअर स्ट्राईक
या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना देखील कठोर शब्दात समज दिली. त्याशिवाय, भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला चढवला. यामध्ये जवळपास 250 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. शिवाय, पाकिस्तानविरोधात देखील भारतानं कठोर पावलं उचलली. पाकिस्तानचं पाणी रोखणं असो अथवा पाकच्या वस्तूंवर आयात शुल्क लावणं यासारखे निर्णय भारतानं घेतले.
ऑपरेशन ऑल आऊट
दिवसेंदिवस दहशतवाद्यांची काश्मीरमध्ये घुसखोरी वाढत असून भारतीय जवानांकडून त्यांना खात्मा केला जात आहे. दहशतवाद्यांची वाढती घुसखोरी पाहता सरकारनं देखील जवानांना कठोर करावाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान लष्करानं देखील ऑपरेशन ऑल आऊटद्वारे आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांना यमसदनीस धाडले आहे.
रेल्वेचं रडगाणं आणि मुंबईकरांचा संताप, पाहा SPECIAL REPORT