पुलवामा हल्ल्याची माहिती उशीरा कळाली? पंतप्रधानांनी विचारला अजित डोवालांना जाब

या भीषण हल्ल्याची माहिती पंतप्रधानांना का कळू शकली नाही याचा तपास आता पंतप्रधानांचं कार्यालय घेत आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 07:37 PM IST

पुलवामा हल्ल्याची माहिती उशीरा कळाली? पंतप्रधानांनी विचारला अजित डोवालांना जाब

नवी दिल्ली 21 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याने सर्व देश हादरून गेलाय. या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. पण या हल्ल्याची माहिती उशिरा मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या दिरंगाईबद्दल पंतप्रधान कार्यालयानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे स्पष्टीकरण मागवल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधान मोदी काही कामानिमित्त दिल्लीबाहेर होते. खराब हवामानमुळे पंतप्रधानांपर्यंत माहिती पोहोचायला उशीर झाल्याचं सांगण्यात येतंय. पण या दिरंगाईवर मोदी नाराज आहेत. पंतप्रधान मोदी सगळ्या घटनांवर तातडीने ट्विट करून प्रतिक्रिया देतात. हल्ला झाल्यानंतर  पंतप्रधानांची प्रतिक्रिया येईल अशी सगळे वाट बघत होते. मात्र पंतप्रधानांची प्रतिक्रिया थोडी उशीरा आली होती.

देशात घडलेल्या महत्त्वाची घटनांची माहिती पंतप्रधानांना तातडीने कळवणं आवश्यक असते. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयात खास आणि अतिशय गुप्त तसच अतिशय सुरक्षीत अशी यंत्रणा कार्यरत असते. त्या यंत्रणेमार्फेतच पंतप्रधानांपर्यंत माहिती पोहोचते. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे थेट पंतप्रधानांना बोलू शकतात अशीही व्यवस्था आहे.

अशी सगळी व्यवस्था असताना या भीषण हल्ल्याची माहिती पंतप्रधानांना का कळू शकली नाही याचा तपास आता पंतप्रधानांचं कार्यालय घेत आहे. असं झालं असेल तर ती फार मोठी चूक समजली जाते. अजित डोवाल हे पंतप्रधानांचे अतिशय विश्वासू सहकारी आहेत. त्यांना पंतप्रधानांचे डोळे आणि कान असं समजलं जाते. त्यामुळे ही गफलत कशी घडली याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 07:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...