Elec-widget

जैश चा तळ उध्दवस्त करणाऱ्या भारताच्या या 'बॉम्ब'ने चीनलाही फुटतो घाम!

लढाऊ विमानातून टाकल्यानंतर SPICE-2000 हा बॉम्ब चुकीच्या टार्गेटकडे जात असेल तर त्याला योग्य दिशा दाखवता येते.

  • Share this:

26 फेब्रुवारीला भारताच्या मिराज 200 या विमानांनी जैश ए मोहंमद च्या तळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती SPICE-2000 या बॉम्बची. लक्ष्याला अचूक भेदण्याची क्षमता असलेल्या या बॉम्बमुळे पाकिस्तानबरोबरच चीनलाही दहशत आहे. भारतीय वायुदलाचाही या बॉम्बवर मोठा विश्वास आहे.

या बॉम्बचं वैशिष्ट्य म्हणजे हा गाईडेड बॉम्ब आहे. यात दोन भाग आहेत. पहिल्या भागाच्या पुढे एक कॅमेरा लावलेला असतो. तर मागच्या भागात एक चीप लावलेली आहे. त्यातून यावर नियंत्रण ठेवता येते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा बॉम्ब टार्गेटचा फोटो काढून तो आपल्या मेमरीत असलेल्या फोटोशी जुळवून बघतो आणि नंतर लक्ष्यभेद करतो. SPICE चा अर्थ आहे  Smart, Precise Impact, Cost-Effective

हा बॉम्ब टाकण्याआधी एक प्रोग्राम बनवला जातो आणि त्याच्या मेमरी चीपमध्ये फिड केला जातो. किती उंचीवरून, केव्हा, कुठल्या दिशेला आणि किती वेळात लक्ष्यभेद करायचं हे सगळं आखून दिलं जातं. त्यानुसार SPICE-2000 सगळं काम फत्ते करतो.

Loading...

या बॉम्बचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवता येते. लक्ष्याचा वेध घेत असताना दिशा चुकली तर त्याला योग्य दिशा दिला जावू शकते. जे टार्गेट आहे त्याचे फोटो आधीच स्पाईस च्या मेमरीत टाकले जातात. लक्ष्याच्या जवळ गेल्यानंतर स्पाईस त्याचे फोटो घेतो आणि तेच टार्गेट आहे की नाही याची खातर जमा करतो. ते योग्य असेल तर मग टार्गेट उध्दवस्त केलं जाते.

भारताने बालकोटमधल्या जैश च्या तळाला उध्वस्त केले नाही अशी चर्चा होती मात्र. त्याची शक्यताच नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण अचूक लक्ष्याचा वेध घेणं हेच या बॉम्बचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कुणीही शंका घेऊ नये असं तज्ज्ञांच मत आहे.

या खास बॉम्बची निर्मिती इस्त्रायल करत असतो. इस्त्रायलची  राफेल अॅ़डव्हांस डिफेंस सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी हे बॉम्ब बनवते. मिराज 2000मधून ते टाकता येवू शकतात. जगातल्या शक्तिशाली बॉम्बमध्ये स्पाईसचा समावेश होतो. त्यामुळे चीनही या शक्तिला घाबरून असतो असं तज्ज्ञांच मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...