Pulwama : दहशतवादी हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणणाऱ्या तरुणाला कंपनीने केलं निलंबित

Pulwama : दहशतवादी हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणणाऱ्या तरुणाला कंपनीने केलं निलंबित

'याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईक' अशा अर्थाची एक पोस्ट फेसबुकवर शेअर करणाऱ्या काश्मिरी तरुणाला मुंबईच्या फार्मा कंपनीने कामावरून निलंबित केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर हळहळ आणि निषेध व्यक्त केला जात आहे. पण मॅकलिओड्स फार्मा नावाच्या कंपनीत काम करणाऱ्या रियाझ अहमद वानी यानं मात्र देशविरोधी विधान त्याच्या फेसबुक अकाउंटवरून केलं.

रियाझ अहमद वानी यानं पुलवामाच्या या भ्याड हल्ल्याचा उल्लेख सर्जिकल स्ट्राईक असा केला. त्याबद्दल कंपनीने रियाझला तातडीने निलंबित करत कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.

CRPF च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यावर जैश ए महम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 37 जवान शहीद झाले. गेल्या दोन दशकात काश्मीरमध्ये झालेला हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. मात्र या काश्मिरी तरुणाने या हल्ल्याचं समर्थन करत टती या कंपनीच्या निदर्शनाला येताच फार्मा कंपनीने तातडीने कारवाी केली आहे.

Macleods Pharma ही मुंबईतली मोठी औषधनिर्माण कंपनी आहे. रियाझ वानी हा या कंपनीच्या श्रीनगर ऑफिसमध्ये कामाला आहे. मॅकलीओड्सचे जनरल मॅनेजर केशव यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे .भारतविरोधी विधान केल्याबद्दल ही कारवाई केली असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

First published: February 15, 2019, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading