पुलवामा हल्ला : जवानांची मोठी कारवाई, वाहनात स्फोटकं ठेवणारा दहशतवादी ठार

पुलवामा हल्ला : जवानांची मोठी कारवाई, वाहनात स्फोटकं ठेवणारा दहशतवादी ठार

जैश-ए-मोहम्मदचा 24 वर्षांचा दहशतवादी मुदस्सिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई याने पुलवामा दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती, अशी माहिती समोर आली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 11 मार्च :  पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारतीय लष्कराला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्याच्या दिवशी गाडीमध्ये स्फोटके ठेवणाऱ्या दहशतवाद्यालाही जवानांनी ठार केले आले आहे. रविवारी (10 मार्च)पुलवामामध्ये झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी मुदस्सिर अहमद खान नावाच्या दहशतवाद्याचा खात्मा केला. पुलवामा हल्ल्यामध्ये घातपातासाठी ज्या गाडीचा वापर करण्यात आला होता, त्यामध्ये स्फोटकं ठेवण्याचे काम दहशतवादी मुदस्सिरने केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मुदस्सिर 24 वर्षांचा होता. 2018मध्ये तो 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये सहभागी झाला होता. जैशनं घडवून आणलेल्या अनेक घातपाताच्या कारवायांमध्ये त्याचा समावेश होता. मुदस्सिरने पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड कामरानसोबत स्फोटकं बनवली आणि हीच स्फोटकं त्यानं वाहनात ठेवण्याचं काम केले होतं. कामरान आणि मुदस्सिरने वाहन आत्मघातकी हल्ल्यासाठी विशेष पद्धतीची स्फोटकं बनवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत जवानांनी कामरानला यमसदनी धाडले होते.

वाचा : त्राल चकमकीत जवानांना मोठं यश, 3 दहशतवाद्यांचा केला खात्मा

याव्यतिरिक्त जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद भटचाही जवानांनी रविवारी चकमकीदरम्यान खात्मा केला. वाहन विकत घेण्यासाठी आणि घटनास्थळावर वाहन आणण्यासाठी मदत केल्याचा आरोप सज्जादवर होता. पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसांनी त्राल परिसरात झालेल्या आयईडी हल्ल्यामागेही सज्जादचा हात होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आपली दहशतवादाविरोधातील मोहीम आणखी तीव्र स्वरूपात केली आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या मोहीमेमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे.

कोण होता मुदस्सिर अहमद खान?

जैश-ए-मोहम्मदचा 24 वर्षांचा दहशतवादी मुदसिर अहमद खान याने पुलवामा हल्ल्याची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशयन होता. 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. मुदस्सिरने आत्मघाती हल्ला घडवण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन आणि स्फोटके मिळवून दिली होती. फेब्रुवारी 2018 मध्ये संजावान येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही त्याचा हात होता. या हल्ल्यात 6 जवान शहीद आणि एक नागरिकाचा मृत्यू झाला होता.

==========================================================================================

VIDEO : भाजपवरील जहरी टीकेनंतर गिरीश महाजनांनी दिलं राज ठाकरेंना आव्हान

First published: March 11, 2019, 8:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading