मराठी बातम्या /बातम्या /देश /पुलवामा हल्ल्याप्रकरणात NIAची धक्कादायक माहिती, ऑनलाइन मागवण्यात आली होती स्फोटकं

पुलवामा हल्ल्याप्रकरणात NIAची धक्कादायक माहिती, ऑनलाइन मागवण्यात आली होती स्फोटकं

चौकशीदरम्यान खळबळजनक माहिती समोर आली आहे.

चौकशीदरम्यान खळबळजनक माहिती समोर आली आहे.

चौकशीदरम्यान खळबळजनक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA)ने पुलवामा हल्ल्यासंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. या हल्ल्याप्रकरणी NIA ने शुक्रवारी जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) आरोपी शाकिर बशीर मागरे याला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या शाकिर बशीर मागरे याने आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डार याला रसद पुरवली होती. या हल्ल्यावेळी वापरण्यात आलेले बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे अमोनियम नाइट्रेट, नाइट्रो-ग्लिसरीन आणि आरडीएक्स हे ऑनलाइन खरेदी करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती शाकिर बशीर मागरे याच्या चौकशीनंतर समोर आली आहे.

'22 वर्षीय आरोपी शाकिर बशीर मागरे याने असा खुलासा केला आहे बॅटरी आणि अमोनियम नायट्रेट जे त्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं होतं, ते ऑनलाइन खरेदी केलं होतं,' अशी माहिती 'न्यूज18'सोबत बोलताना ANI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

पुलवामात नेमकं काय घडलं होतं?

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या एका आतंकवाद्याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीने सीआरपीएफ जवानांच्या बसला टक्कर मारून अपघात घडवला होता. यामुळे झालेल्या स्फोटात 39 जवान शहीद झाले होते तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते.

First published:

Tags: Pulwama, Pulwama attack