पाकिस्तानला दणका, सुरक्षा परिषदेत चीनचा भारताला पाठिंबा

पाकिस्तानला दणका, सुरक्षा परिषदेत चीनचा भारताला पाठिंबा

आत्तापर्यंत भारताने जेव्हा जेव्हा जैश चा प्रमुख मसूद अजहर याच्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव आणला त्या प्रत्येक वेळी चीनने त्याला विरोध केला.

  • Share this:

न्यूयॉर्क 22 फेब्रुवारी : जगभरातून दबाव वाढत असतानाच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला दणका बसलाय. सुरक्षा परिषदेत आज पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यासाठी भारताने जो प्रस्ताव मांडला होता त्याला चीनने पाठिंबा दिलाय. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला हादरा बसला आहे.

जगातल्या सर्व बड्या देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानची निर्भत्सना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेत आज या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला. या ठरावत पाकिस्तान मदत करत असलेल्या 'जैश ए मोहोम्मद' या संघटनेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत भारताने जेव्हा जेव्हा जैश चा प्रमुख मसूद अजहर याच्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव आणला त्या प्रत्येक वेळी चीनने त्याला विरोध केला. त्यामुळे चीनच्या आजच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्राची सर्वात महत्त्वाची परिषद असून निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आहेत. ज्या पाच देशांना नकाराधिकार आहे त्यात चीनचाही समावेश आहे. सुरक्षा परिषदेच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची आणखी कोंडी होणार आहे.

पाकिस्तानची तयारी

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. याची धास्ती आता पाकिस्तानने घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील अनेक गावं स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोल(LoC )जवळील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 127 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच LoC जवळील 40 पेक्षा जास्त गावं खाली करण्यात आली आहेत.

पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहरला जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयातून काढून बाहेर लपवण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावलपिंडीमध्ये एका सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. रावलपिंडीमध्ये पाकिस्तानची गुप्तचर एजेंसी असलेल्या ISI चं मुख्यालय आहे.

VIDEO : 'याची' तरी अक्कल आहे का?' धनंजय मुंडेंचा पंकजा यांच्यावर घणाघात

First published: February 22, 2019, 2:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading