पुलवामा दहशतवादी हल्ला: सुसाइड बॉम्बरला मदत करणारा मास्टरमाईंड अटकेत

पुलवामा दहशतवादी हल्ला: सुसाइड बॉम्बरला मदत करणारा मास्टरमाईंड अटकेत

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्ठेला (एनआयए) मोठं यश मिळालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,28 फेब्रुवारी: जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्ठेला (एनआयए) मोठं यश मिळालं आहे. सुसाइड बॉम्बर आदिल अहमद डार उर्फ आदिल अहमद गादी टेकरनवाला उर्फ वकास कमांडो याला मदत करणारा शाकिर बशीर मागरे याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असलेल्या शाकिर बशीरने आदिल अहमद डार याला राहण्यास घर उपलब्ध करून दिले होते.

अटक करण्यात आलेल्या शाकिर बशीर मागरे याने आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डार याला रसद पुरवली होती. या हल्ल्यावेळी वापरण्यात आलेले बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे अमोनियम नाइट्रेट, नाइट्रो-ग्लिसरीन आणि आरडीएक्स हे ऑनलाइन खरेदी करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती शाकिर बशीर याच्या चौकशीनंतर समोर आली आहे. '22 वर्षीय आरोपी शाकिर बशीर मागरे याने असा खुलासा केला आहे बॅटरी आणि अमोनियम नायट्रेट जे त्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी वापरले होते, ते ऑनलाइन खरेदी केले होते,' अशी माहिती 'न्यूज18'सोबत बोलताना ANI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा या अवंतीपोराजवळ असलेल्या ठिकाणी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केला. या वाहनात स्फोटके भरलेली होती. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील सुमारे 40 जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर हल्लेखोरदेखील मरण पावला होता. या ताफ्यात सुमारे 78 वाहने व सुमारे 2500 पेक्षा जास्त जवान होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित इस्लामिक गट जैश-ए-महंमदने स्वीकारली होती.

आदिल अहमद डार असे त्या आत्मघातकी हल्लेखोराचे नाव होते. या अपघातानंतर त्या हल्लेखोराचा एक व्हिडियो जारी करण्यात आला होता. या हल्ल्यात एका मारुती इको वाहनाचा वापर करण्यात आला होता. या वाहनात सुमारे 300 किलो स्फोटके असावीत, असा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यसभेवर राष्ट्रवादीकडून दोन नावं निश्चित, माजीद मेनन यांचा पत्ता कट?

First published: February 28, 2020, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading