Pulwama : 'हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि ISI चा हात', भारतीय सेनेची माहिती

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 11:26 AM IST

Pulwama : 'हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि ISI चा हात', भारतीय सेनेची माहिती

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने पत्रकार परिषद घेतली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने ISI आण च्या मदतीने हा हल्ला केला आहे, अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.

'जो बंदूक हाती घेईल त्याला मारलं जाईल. आत्मसमर्पण करा आणि शांतता प्रस्थापित करा. दहशतवाद्यांच्या आई-वडिलांनी त्यांना समर्पण करण्यास सांगावं,' असं आवाहन सैन्याने केलं आहे.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

-जैशचा काश्मीरमधील मुख्य दहशतवादी मारला गेला आहे

-100 तासांच्या आता 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Loading...

-हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

दरम्यान, पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान येते दहशतवादी लपून बसल्याची खबर लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्करानं दहशतवादी लपून बसलेल्या घराला घेरलं. दरम्यान, दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली. या कारवाईमध्ये लष्करानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे दोन्ही दहशतवादी जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते. पुलवामा हल्ल्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता. या कारवाईमध्ये चार जवान शहीद झाले.

गुजरातमध्ये अलर्ट

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. यात प्रमुख रेल्वे स्थानक, गुजरातची किनारपट्टी, स्टेच्यू ऑफ युनिटी, धार्मिक स्थळ आणि चित्रपटगृहांचा समावेश आहे. राज्य पोलिस दलाने या सर्व ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दहशतवादी गुजरातमध्ये असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाने गुजरातसह देशातील अन्य मुख्य शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. काश्मीरनंतर दहशतवादी दिल्ली आणि उत्तर प्रदेशकडे येण्याची शक्यता आहे. दहशतवादी उत्तर प्रदेशमधून शस्त्र विकत घेऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधून शस्त्रसाठा घेऊन काश्मीरला जाणाऱ्या काही जणांना दिल्लीत अटक करण्यात आली होती.


Pulwama Encounter: 'बाबा तुमची वाट पाहत आहेत; चकमकीत अडथळा आणू नका'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...