पुलवामा हल्ला ही मोदींना जैशने दिलेली भेट, माजी रॉ प्रमुखांचे खळबळजनक वक्तव्य

पुलवामा हल्ला ही मोदींना जैशने दिलेली भेट, माजी रॉ प्रमुखांचे खळबळजनक वक्तव्य

...तर काश्मीरमध्ये अशी परिस्थिती उद्भवली नसती : माजी रॉ प्रमुख

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : गुप्तचर संस्था रॉ चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवाद्यानी दिलेली भेट असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दुलत यांच्या मते, दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने निवडणुकीच्या आधी भाजपला भेट म्हणून पुलवामा हल्ला केला. त्यांनी असंही म्हटलं की, पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेला एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकची कारवाई योग्य होती.

दुलत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, याआधीही मी याबद्दल बोललो आहे. जैशने भाजप, मोदी यांना एक भेटच दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या हल्ल्याची भीती होती आणि ती खरी ठरली. त्यानंतर पाकिस्तानात घुसून कारवाई करणं योग्य होतं.

इंडियन इकॉनॉनिक ट्रेड ऑर्गनायझेशन 2019 च्या कार्यक्रमात दुलत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दुलत यांनी फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा हवाला देत म्हटले की, आपण पूर्वग्रह सोडले पाहिजेत. नाहीतर कट्टर राष्ट्रवाद वाढेल आणि याचा परिणाम युद्धच असेल. दुलत यांनी न्यूझीलंडमधील हल्ल्यानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांच्या प्रतिक्रियेचं कौतुक केलं आहे.

दुलत म्हणाले की, आपल्याला काश्मीरमधील लोकांशी चर्चा करण्याची गरज आहे. पाकिस्तानसोबतही बोलायला हवे. चर्चेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. एकवेळ अशी होती की, मनमोहन सिंग सरकार समझोत्यापासून एक पाऊल दूर होते. जर तो समझोता झाला असता तर काश्मीरमध्ये अशी परिस्थिती उद्भवली नसती. दुलत यांनी मनमोहन सिंग आणि मुशर्रफ यांच्यात होणारा करार होता होता राहिला होता.

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताच्या हवाई दलाने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील बालाकोटमध्ये घुसून जैशच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त केलं होतं.

VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

First published: March 31, 2019, 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading