LIVE UPDATES : पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातला सगळ्यांत मोठा हल्ला, 42 जवान शहीद

LIVE UPDATES : पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातला सगळ्यांत मोठा हल्ला, 42 जवान शहीद

पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 42 जवान शहीद झाले तर तब्बल 45 हून अधिक जवान जखमी झाले आहेत.

  • Share this:

पुलवामा, 14 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशहतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 42 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. तर 45 पेक्षा जास्त जवान जखमी असल्याची प्राथमिक माहित देण्यात येत आहे.

दहशतवाद्यांनी अचानक हा आत्मघातकी हल्ला केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची टीम गाडीतून जात होती, त्या वेळी हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर गोळीबारही झाला, अशी माहिती जम्मू काश्मीरचे DGP दिलबाग सिंग यांच्याकडून देण्यात आली आहे.

या वर्षांतला हा मोठा हल्ला मानला जात आहे. न्यूज 18 सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 42 जवान शहीद झाले आहेत. तर 45 जखमी झालेत. जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.


अजित डोवल यांनी बोलावली तातडीची बैठक

दरम्यान, राजनाथ सिंह तातडीने श्रीनगरला रवाना होणार असल्याचं वृत्त आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

URI नंतरचा सर्वात मोठा हल्ला, काश्मीर हाय अलर्टवर; तालिबानी आणि ISIS पॅटर्नने केला हल्ला

हल्ल्यासाठी आयईडी बाँब पेरले होते. जैश बरोबर हिज्बुल मुजाहिदीनचीही या हल्ल्यात साथ असण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजतं.

जवानांची गाडी जात होती, त्या ठिकाणी आयईडी बाँब पेरला होता. हा बाँब कधी पेरला, कुणी पेरला हे अजून अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेलं नाही.


मोदींंनी केला निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.
पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा भीषण हल्ला, ग्राऊंडवरून पहिला VIDEO


URI मध्ये संशयास्पद हालचाली; भारतीय लष्कराचे सर्च ऑपरेशन

दरम्यान, दोन दिवसांआधी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे भारतीय लष्कराच्या कॅम्पजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्या होत्या. भारतीय लष्कराने संपूर्ण परिसरात अलर्ट जारी केला असून जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं.


सुरक्षेच्या दृष्टीने उरी हा संवेदनशील भाग आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ असलेल्या राजरवानी आर्मी आर्टिलरी युनिट जवळ काही लोकांना पाहण्यात आलं. त्यानंतर जवानांनी गोळीबार सुरु केला. पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर लष्कराने वेगाने सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं.


उरी येथील लष्कराच्या कॅम्पवर 2016मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. 18 आणि 19 डिसेंबर रोजी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतली होती. भारतीय जवान झोपेत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे.
(ही बातमी अपडेट होत आहे.)


संबंधित बातम्या


तब्बल 2500 CRPF जवान होते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर...!


पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण, आणखी हल्ल्यांची धमकी?


URI नंतरचा सर्वात मोठा हल्ला, काश्मीर हाय अलर्टवर; तालिबानी आणि ISIS पॅटर्नने केला हल्ला


पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा भीषण हल्ला, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 07:50 PM IST

ताज्या बातम्या