PUBG गेममुळे पती-पत्नीच्या नात्यात अंतर, महिलेकडून घटस्फोटाची मागणी

PUBG गेममुळे पती-पत्नीच्या नात्यात अंतर, महिलेकडून घटस्फोटाची मागणी

एकीकडे पबजी गेम काही जणांच्या मृत्यूचं कारण ठरत असताना आता पती-पत्नीच्या नात्यातही या गेममुळे दुरावा येत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 19 मे : गेल्या काही दिवसांत पबजी गेम केवळ वादग्रस्त कारणांमुळेच चर्चेत आहे. एकीकडे हा गेम काही जणांच्या मृत्यूचं कारण ठरत असताना आता पती-पत्नीच्या नात्यातही या गेममुळे दुरावा येत असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका हिंदी वेबपोर्टलनं दिलेल्या वृत्तानुसार, पबजी खेळताना एका महिलेला तिच्या गेमिंग पार्टनरची सोबत इतकी आवडू लागली की तिनं आपल्या पतीकडे चक्क घटस्फोटाची मागणी केली आहे. एवढंच नाही तर यासाठी तिनं वुमन हेल्पलाइनकडे मदतीचीही मागणी केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील ही धक्कादायक घटना आहे.

पाहा :रोईंगपटू दत्तू भोकनळ विरोधात तरुणीने केला गुन्हा दाखल, पाहा SPECIAL REPORT

वुमन हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पतीकडून घटस्फोटाची मागणी करणाऱ्या महिलेचं वय 19 वर्ष एवढं आहे. वयाच्या 18 व्या वर्षी तिचा विवाह एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसोबत झाला होता. लग्नानंतर तिला पबजी खेळण्याची सवय लागली. यामध्ये तिची आपल्या गेमिंग पार्टनरसोबत मैत्री वाढली. गेमिंग पार्टनरसोबतची तिची मैत्री इतकी वाढली की तिनं थेट पतीकडे घटस्फोटाची मागणी केली.

पाहा :SPECIAL REPORT: कमल हसन यांची जीभ छाटा, दक्षिणेत 'गोडसे वादा'चा भडका

याबाबत महिलेनं सांगितलं की, 'माझे पतीसोबत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. मात्र पुढे माझी गेमिंग पार्टनरसोबत राहण्याची इच्छा आहे'.

गेमिंग पार्टनरसोबत जवळीकता वाढल्यानं महिलेच्या तिच्या पतीसोबत वादावादी होऊ लागली. रोजच्या भांडणाला कंटाळून महिला आता आपल्या वडिलांच्या घरी राहत आहे.

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राडा, भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या

First published: May 17, 2019, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading