PUBG चा नाद खुळा! घरातून गायब झाला मुलगा, तब्बल 1,500 किमी दूर महाराष्ट्रात सापडला

PUBG चा नाद खुळा! घरातून गायब झाला मुलगा, तब्बल 1,500 किमी दूर महाराष्ट्रात सापडला

17 फेब्रुवारीला PUBG खेळता खेळता हा मुलगा घराबाहेर पडला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही.

  • Share this:

सोलन, 20 फेब्रुवारी :  PUBG ने इतकं वेड लावलं आहे की आपलं खरं अस्तित्व सोडून तरुण आभासी  दुनियेत हरवत चाललेत. आता तर या पब्जीच्या नादापायी खरोखरच एक मुलगा हरवला. हिमाचल प्रदेशमधून (Himachal Pradesh) गायब झालेला हा मुलगा सापडला तो थेट महाराष्ट्रात (Maharashtra). पब्जीचा टास्क पूर्ण करण्यासाठी हा मुलगा आपल्या घरापासून इतक्या दूर कधी पोहोचला याची कल्पनाही त्याला नसावी, मोबाईन लोकेशनमार्फत या मुलाचा पत्ता समजला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलनच्या कुनिहारमधून एक मुलगा 17 फेब्रुवारीला अचानक गायब झाला होता. त्याच्या कुटुंबाने कुनिहारच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं असता महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये दाखवत होतं. त्यानंतर कुनिहार पोलिसांनी तिथल्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस चाइल्ड युनिटने या मुलाला आपल्याकडे सुरक्षित ठेवलं. त्याला घेण्यासाठी कुनिहार पोलीस आणि मुलाचे नातेवाईक औरंगाबादकडे रवाना झाले.

हेदेखील वाचा - VIDEO पाहून किळस येईल! बिअरच्या ग्लासात पडलेल्या पालीला वाचवण्यासाठी केला कहर

पोलीस सूत्रांच्या मते, हा मुलगा PubG गेम खेळताना त्यातील टास्क पूर्ण करण्याच्या नादात घराबाहेर पडला. त्यानंतर तो आपल्या घरापासून तब्बल 1,551.4 किलोमीटर दूर महाराष्ट्रातल्या औरंगाबादमध्ये पोहोचला याची कल्पना त्यालाही नव्हती.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शिव कुमार यांनी सांगितलं की, "17 फेब्रुवारीला हा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. तपासात तो महाराष्ट्रातल्या मनमाडमध्ये असल्याचं समजलं. तिथल्या पोलिसांशी संपर्क करून मुलाला ताब्यात घेण्यात आलं. त्याला घेण्यासाठी पोलीस आणि त्याचे नातेवाईक महाराष्ट्रात पोहोचलेत"

हेदेखील वाचा - हा धाडसीपणा नव्हे मूर्खपणा; ‘त्या’ व्हिडिओवर रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 02:42 PM IST

ताज्या बातम्या