धक्कादायक! PUBG च्या नादात खाणंपिणंही सोडलं; 16 वर्षीय मुलाने गमावला जीव

धक्कादायक! PUBG च्या नादात खाणंपिणंही सोडलं; 16 वर्षीय मुलाने गमावला जीव

कोरोना लॉकडाऊनमध्ये PUBG मुळे मुलाचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

  • Share this:

हैदराबाद, 13 ऑगस्ट : सध्या कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमध्ये मुलं घरात आहेत. मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप याचा वापर मुलं अधिक करत आहेत. ऑनलाइन गेम खेळण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. पब्जीने (PUBG) तर आधीपासूनच मुलांना वेड लावलं आहे मात्र आता लॉकडाऊनमध्ये मुलांना पब्जीचा इतका नाद लागला आहे की अगदी खाणंपिणंही मुलं विसरलीत. पब्जीसाठी आंध्र प्रदेशमधील मुलगा असाच सातत्याने कित्येक दिवस उपाशी राहिला आणि आता त्याचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशमधील 16 वर्षांचा मुलगा. लॉकडाऊनमध्ये आपला सर्वाधिक वेळ ऑनलाइन गेम विशेषत: पब्जी खेळण्यात घालवत होता. द हिंदूच्या रिपोर्टनुसार कित्येक दिवस हा मुलगा काही न खातापिता खेळायचा. काही दिवसांतच तो आजारी पडू लागला. त्याला गंभीर असं डिहायड्रेशन झालं.

त्याच्या पालकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं. सुरुवातीला तिथं त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह होता. मात्र त्याला गंभीर असं डिहायड्रेशन झालं आणि रुग्णालयात नेल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा - लज्जास्पद! प्रियकरासोबत आईने लेकीला दाखवले PORN VIDEO, पुण्यातला भयंकर प्रकार

अशी घटना पहिल्यांदाच घडली नाही. याच वर्षी आणखी एका 16 वर्षाच्या मुलाचा असाच मृत्यू झाला आहे. सलग सहा तास ऑनलाइन गेम खेळल्याने त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा जीव गेला. 28 मे रोजी मध्य प्रदेशमध्ये घडलेली ही घटना आहे. फारूखाँ असं या मुलाचं नाव आहे. त्याच्या कुटुंबाच्या माहितीनुसार दुपारच्या जेवणानंतर त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसनच लागलं होतं.

दुपारी जेवण झाल्यानंतर फारूखाँ  गेम खेळायला सुरुवात करायचा. सहा तासांपेक्षा अधिक वेळ तो गेम खेळायचा. जेव्हा तो जमिनीवर कोसळला तेव्हाही तो खूप चिडलेला होता आणि दुसऱ्या प्लेअरवर मोठमोठ्याने ओरडू लागला, असं त्याचे वडील हरून रशीद कुरेशी यांनी सांगितलं.

हे वाचा - हाच खरा प्रिन्स! पक्ष्याच्या घरट्यासाठी दुबईच्या राजकुमारने आपली मर्सिडीज दिली

पब्जीच्या वेडाचं आणखी एक उदाहरण म्हणजे पंजाबधील 17 वर्षीय मुलानं तर virtual ammunition खरेदी करण्यासाठी आपल्या वडीलांच्या बँक अकाऊंटमधील तब्बल 16 लाख रुपये खर्च केले. ऑनलाइन क्लासेससाठी म्हणून तो आपल्या वडीलांचा मोबाइल फोन वापरत होता. मात्र त्याने स्वत:साठी आणि मित्रांसाठी वडीलांचे लाखो रुपये उधळले.

Published by: Priya Lad
First published: August 13, 2020, 11:21 PM IST

ताज्या बातम्या