हैदराबाद, 03 जानेवारी : मोबाईल गेम PUBG या खेळाची क्रेझ दिवसेंदिवस तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. यात शाळेतील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये पबजीचे वेड जास्त दिसून येते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मंदिराचा पुराजीही या गेमच्या क्रेझपासून वाचू शकलेला नाही. हैदराबाद पोलिसांनी अशाच एक पुजाऱ्याला अटक केली आहे. या पुजाऱ्यानं आपली हौस पूर्ण करण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग निवडला.
19 वर्षीय युवा पुजाऱ्याला पबजी या व्हिडीओ गेमचे वेड लागले होते. ऐवढेच नाही तर आपली खेळण्याची हौस पूर्ण करण्यासाठी आणि जास्त पैसे पूर्ण करण्यासाठी चक्क मंदिराबाहेरील सायकली चोरी करण्याचा निर्णय त्यानं घेतला. नंदुला सिद्धार्थ शर्मा असे या युवा पुजाऱ्याचे नाव असून त्यानं वेद अभ्यास केला आहे. सध्या मौला अली येथील मंगापुरम जवळील मंदिरात पुजारी आहे.
वाचा-तो पळत राहिला तरी मित्र करत होता चाकूने वार, हत्येचा थरारक VIDEO
वाचा-VIDEO पाहून तुमचीही मान शरमेने खाली जाईल! महिला इमारतीवरून उडी मारत होती आणि...
सिद्धार्थ याच भागात आपल्या आईसोबत राहतो. बऱ्याच काळापासून जवळच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करत होता, पण अलीकडच्या काळात त्याला पबजी मोबाईल गेमचे वेड लागले. त्यामुळं पबजी खेळण्याची हौस पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ नेहमी आईशी भांडायचा. मात्र, जेव्हा त्याला घरातून पैसे मिळू शकले नाहीत तेव्हा त्याने शेजार्यांच्या सायकल चोरण्यास सुरवात केली. त्यानंतर मंदिराजवळ ज्या सायकली त्याला दिसायच्या त्यांची तो चोरी करायचा आणि विकायचा.
वाचा-साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चालले होते दिव्यांग शिक्षक,बसच्या धडकेत जागीच ठार
वाचा-पॉर्न बघण्याच्या नशेत हिंसक होत आहेत भारतातील तरुण, धक्कादायक आकडेवारी समोर
या तरुण पुजार्याने आतापर्यंत एकूण 31 दुचाकी चोरी केल्या आहेत. परंतु गुरुवारी मालकजगिरी पोलिस ठाण्यात हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याची चोरी उघडकीस आली. सिद्धार्थकडून पोलिसांनी 17 दुचाकीही जप्त केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PUBG