माथेफिरू प्रियकराने 'या' अभिनेत्रीला 2 तास ठेवलं डांबून

अभिनेत्री रितू सिंहवर आपलं प्रेम असल्याचा दावा आरोपीनं केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 09:49 PM IST

माथेफिरू प्रियकराने 'या' अभिनेत्रीला 2 तास  ठेवलं डांबून

लखनौ, 25 मे : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र शहरात एका माथेफिरू चाहत्यानं भोजपुरी अभिनेत्रीला तब्बल 2 तास हॉटेलच्या एका रूममध्ये डांबून ठेवलं. या तरुणाचं नाव पंकज यादव असं आहे. आरोपीनं अभिनेत्रीला रुममध्ये बांधून ठेवलं तसेच माझ्याशी आत्ताच लग्न कर अशी धमकी देत गोळीबार सुरू केला. यामध्ये एक तरुण जखमी झाला. अखेर अथक परिश्रमांनंतर पंकजला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

पोलिस अधीक्षक सलमान ताज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका हॉटेलमध्ये भोजपुरी अभिनेत्री रितू सिंह थांबली होती, त्यावेळी आरोपी पंकज यादव हा जबरदस्तीनं या अभिनेत्रीच्या रूममध्ये घुसला आणि तिला जवळपास 2 तास ओलिस ठेवलं. पोलिसांनी रितू सिंहची सुटका केली. पण या घटनेनं संपूर्ण शहरात मोठी खळबळ माजली. पोलिसांनी सांगितलं की, अभिनेत्री रितू सिंह एक सिनेमाच्या शूटिंगसाठी या हॉटेलमध्ये थांबली होती. तिच्याबरोबर या सिनेमाच्या प्रोडक्शन युनिटचे 70 लोकही होते.

रितू सिंहला याबाबत विचारलं असता ती म्हणाली, आरोपी मागच्या 2-3 वर्षांपासून तिचा पाठलाग करत होता. अभिनेत्रीवर आपलं प्रेम असल्याचा दावा त्यानं केला होता. तसेच तो तिला सतत धमकी देत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. रितूनं यासंबंधी मुंबई पोलिसांकडेही तक्रार केली होती. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा हॉटेलमध्येही प्रचंड गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिस अधीक्षक स्वतः त्या ठिकाणी हजर झाले. त्यांनी कसंबसं समजूत घालून संबंधित आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडील रिव्हॉल्वर ताब्यात घेतलं. दरम्यान आरोपीनं केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


पाहा : संतापजनक! कथित गोरक्षकांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल

Loading...


नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींकडे केला सत्तास्थापनेचा दावा


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...