BREAKING: भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा थोडक्यात बचावले, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यावर चढवला हल्ला

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P Nadda)यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचं समजते.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P Nadda)यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचं समजते.

  • Share this:
    कोलकाता, 10 डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा  (J.P Nadda) यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचं समजतं. पश्चिम बंगालच्या अयोध्या नगरजवळ जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा यात हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा सुखरूप आहेत. मात्र, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. हेही वाचा...शिवसेनेचं अखेर ठरलं! स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याबाबत घेतला मोठा निर्णय जेपी नड्डा यांचा पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज गुरुवारी दुसरा दिवस आहे. ते मुख्यमंत्री ममता बनर्जी याचे पुतणे आणि खासदार अभिषेक बनर्जी यांचा मतदार संघ डायमंड हार्बर जात होते. या दरम्यान, जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. त्याच्या ताफ्यावर तुफान दगडफेक केली. #WATCH Protestors pelt stones at the vehicle of BJP leader Kailash Vijayvargiya in Diamond Harbour दक्षिण 24 परगनामध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. नड्डा यांचा ताफा रोखण्याचा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या ताफ्यावर दगडफेक केली. या घटनेनंतर भाजपनं टीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनीच जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. मात्र, टीएमसीनं भाजपचे सर्व आरोप फेटाळले आहेत.  दरम्यान, आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी भाजप राज्यात सक्रिय झालं असल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा...भारतात येण्यासाठी नेपाळमध्ये बनवले जातात बनावट आधार कार्ड या घटनेनंतर भाजपनं टीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनीच जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. मात्र, टीएमसीनं भाजपचे सर्व आरोप फेटाळले आहेत.  दरम्यान, आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी भाजप राज्यात सक्रिय झालं असल्याचे बोलले जात आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: